अ‍ॅपशहर

पीडित तरुणीविरोधातच पोलिसांची कारवाई

एका १४ वर्षीय अल्पवयीन तरुणीसह तिच्या आईलाही फोन करून अश्लील संभाषण करणाऱ्या विकृत तरुणाची शनिवारी रात्री मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी नग्न धिंड काढली. मात्र या प्रकरणी त्या तरुणासह किंवा मनसेच्या स्टंटबाज कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी पीडित तरुणी, तिची आई आणि तिच्या बहिणीच्या पतीला अटक केली आहे. त्यामुळे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याच्या या प्रकाराबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Maharashtra Times 14 Jun 2016, 4:00 am
फोन करून त्रास देणारा विकृत आणि स्टंटबाज मनसैनिक मोकाट
महाराष्ट्र टाइम्स.कॉम phone fake call
पीडित तरुणीविरोधातच पोलिसांची कारवाई

म. टा. वृत्तसेवा, ठाणे

एका १४ वर्षीय अल्पवयीन तरुणीसह तिच्या आईलाही फोन करून अश्लील संभाषण करणाऱ्या विकृत तरुणाची शनिवारी रात्री मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी नग्न धिंड काढली. मात्र या प्रकरणी त्या तरुणासह किंवा मनसेच्या स्टंटबाज कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी पीडित तरुणी, तिची आई आणि तिच्या बहिणीच्या पतीला अटक केली आहे. त्यामुळे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याच्या या प्रकाराबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

या प्रकरणी कोपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्याच्या कोपरी भागात राहणाऱ्या एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या आईच्या मोबाइलवर काही दिवसांपूर्वी सुनीलकुमार जयस्वाल या तरुणाचा फोन आला. त्यावेळी त्याने त्या महिलेच्या मुलीचे नाव घेत अश्लील संभाषण सुरू केले. त्यावर मुलीच्या आईने त्याला शिव्या दिल्या. असाच प्रकार २ ते ३ वेळा झाल्यानंतर त्या विकृताने पीडित तरुणीचा मोबाइल नंबर मिळवून तिलाही त्रास देणे सुरू केले. या प्रकाराने घाबरलेल्या त्या तरुणीने तिच्या मोठ्या बहिणीच्या पतीला ही बाब सांगितली. त्यानंतर त्यांनी त्या तरुणाला फोन करून शिवीगाळ केली. मात्र त्यानंतरही विकृताचे फोन करून अश्लील संभाषण करण्याचे प्रकार सुरूच राहिले. त्यामुळे या तरुणीच्या भाऊजींनी या तरुणाला बँकेच्या नावाने फोन करत त्याचा माग काढून ऐरोली रेल्वे स्थानकाजवळून त्याला पकडून ठाण्यात आणले. त्यावेळी तिथे जमलेल्या मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी त्या विकृत तरुणाला मारहाण करत नग्न केले आणि त्याची कोपरी पोलिस ठाण्यापर्यंत धिंड काढली.

या प्रकारानंतर पोलिसांनी त्या तरुणासह मनसेच्या स्टंटबाज कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याऐवजी पीडित तरुणीसह तिची आई आणि भावजींवर गुन्हा दाखल केला असता त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज