अ‍ॅपशहर

मोबाइलचोरांचा एक तास थरारक पाठलाग

एका तरुणीच्या हातातील मोबाइलफोन हिसकावून रिक्षातून पळून जाणाऱ्या चार मोबाइलचोरांचा दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी मोटरसायकलवरून एक तास थरारक पाठलाग करून चौघांपैकी एका चोरट्याला पकडण्यात पोलिसांना यश आले.

Maharashtra Times 26 Jul 2018, 4:59 am
उल्हासनगर : एका तरुणीच्या हातातील मोबाइलफोन हिसकावून रिक्षातून पळून जाणाऱ्या चार मोबाइलचोरांचा दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी मोटरसायकलवरून एक तास थरारक पाठलाग करून चौघांपैकी एका चोरट्याला पकडण्यात पोलिसांना यश आले. त्या चोरट्यांनी केलेल्या प्रतिकारात शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे दोन पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची घटना शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mobile-theft


उल्हासनगरमध्ये राहणारी प्राजक्ता (२५) ही तरुणी अंबरनाथ येथील आनंदनगर एमआयडीसी परिसरात एका कंपनीत कामाला आहे. कंपनीमधून सायंकाळी साडेपाचला ती सुटल्यावर सचिन हॉटेलजवळील रिक्षा स्टॅण्डकडून पायी घरी जात होती. त्यावेळी पाठीमागून रिक्षातून आलेल्या चार जणांच्या टोळीपैकी एकाने प्राजक्ताच्या हातातील मोबाइलफोन खेचला आणि ते चौघेही रिक्षातून पळून जाऊ लागले. त्यावेळी आनंदनगर पोलिस चौकीत ड्युटीवर असलेले पोलिस कॉन्स्टेबल घनश्याम ठाकुर व पोलिस सुनील पवार यांना माहिती मिळताच त्यांनी मोटरसायकलवरून चौघांचा पाठलाग केला. तब्बल एक तास पोलिसांनी त्या रिक्षाचा थरारक पाठलाग करून रिक्षा ऑॅर्डनस इस्टेटजवळील डोंगराजवळ थांबवली. चोरांसोबत झालेल्या झटापटीत दोन्ही पोलिसांच्या हाताला मार लागला. परंतु त्यातील विकी (२०) या तरुणाला त्यांनी पकडले. अन्य तीन जण पसार झाले. विकीकडून चोरी केलेला मोबाइल फोन पोलिसांनी जप्त केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज