अ‍ॅपशहर

एसटीमुळे प्रदूषणात भर

सर्वसामान्यांची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या एसटीमुळे प्रदूषण वाढत असून आदिवासी ग्रामीण भागातील जव्हार आगारामधील बसची दुरवस्था झाली आहे. जव्हार शहराचे दळणवळणाचे प्रमुख साधन महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाची एसटी असली तरी अनेक बस नादुरुस्त आहेत.

Maharashtra Times 20 Feb 2018, 10:24 am
म. टा. वृत्तसेवा, पालघर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pollution due to st bus
एसटीमुळे प्रदूषणात भर


सर्वसामान्यांची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या एसटीमुळे प्रदूषण वाढत असून आदिवासी ग्रामीण भागातील जव्हार आगारामधील बसची दुरवस्था झाली आहे. जव्हार शहराचे दळणवळणाचे प्रमुख साधन महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाची एसटी असली तरी अनेक बस नादुरुस्त आहेत. त्यातून मोठ्या प्रमाणात काळा धूर निघत असून या बसची पीयूसीही केली जात नाही. या बस भंगारात काढून नवीन बस आणाव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

बसमधील अनेक आसने तुटलेली असतात. शिवाय खिडक्यांच्या काचा, दरवाजेही तुटलेली आढळतात. स्वच्छतेच्या बाबत तर फारच दुर्लक्ष होत आहे. बसची दुरुस्ती करून ग्राहकांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी मागणीही येथील प्रवासी करीत आहे. शहरात गजबजलेल्या ठिकाणी रहदारी अधिक प्रमाणात असल्याने एसटी बस चालताना प्रचंड प्रमणात धूर बाहेर पडून नागरिकांना प्रदूषणाचा त्रास होतो. यामुळे आजारांना निमंत्रणच मिळत आहे. यावर तोडगा काढण्याची मागणीही प्रवासी करत आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज