अ‍ॅपशहर

ऑनलाइन गोंधळाचा नवा अध्याय

आरटीई प्रवेशाची पहिली फेरी गोंधळाची ठरली असल्याने दुसऱ्या फेरीकडे आशेने पाहणाऱ्या पालकांसमोर ऑनलाइन गोंधळाचा नवा अध्याय आला आहे. दुसऱ्या फेरीत नाव असूनही ऑनलाइन प्रवेशाबाबत एसएमएस न आल्याने पालकांपुढे प्रवेशाचा नवा पेच निर्माण झाला आहे.

Maharashtra Times 29 Mar 2017, 4:00 am
विद्यार्थ्यांची निवड होऊनही एसएमएस पाठवलेच नाहीत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम problems in online admissions under rte
ऑनलाइन गोंधळाचा नवा अध्याय


सानिका कुसूरकर,ठाणे

आरटीई प्रवेशाची पहिली फेरी गोंधळाची ठरली असल्याने दुसऱ्या फेरीकडे आशेने पाहणाऱ्या पालकांसमोर ऑनलाइन गोंधळाचा नवा अध्याय आला आहे. दुसऱ्या फेरीत नाव असूनही ऑनलाइन प्रवेशाबाबत एसएमएस न आल्याने पालकांपुढे प्रवेशाचा नवा पेच निर्माण झाला आहे.

दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना नामांकित शाळेत प्रवेश मिळावा, यासाठी सुरू करण्यात आलेल्या यंदाच्या आरटीई प्रवेशाची पहिली फेरी चांगलीच वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. ६ मार्च रोजी झालेल्या पहिल्या लॉटरी प्रक्रियेत सुरुवातीपासून अनेक अडचणी आल्या. त्यासाठी पालकांना शिक्षण विभागातर्फे वाढीव मुदत देण्यात आली. शाळांच्या मनमानी कारभारावर पालकांनी स्वीकारलेल्या आक्रमक धोरणावर शिक्षण विभागाने स्वतंत्र तक्रार निवारण समित्या स्थापन केल्या. अखेर पहिल्या फेरीतील ३४४४ प्रवेश पूर्ण झाल्यानंतर सोमवारी दुसरी यादी जाहीर झाली. यावेळी लॉइरी सिस्टिम नसून यादीत नाव लागलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना ऑनलाइन प्रणालीद्वारे एसएमएस पाठवण्यात येणार होते. पहिल्या फेरीत नाव न लागलेले पालक दुसऱ्या यादीकडे डोळे लावून बसले होते. सोमवारी ही यादी जाहीर होणार म्हणून संपूर्ण दिवसभर मोबाइलकडे लक्ष ठेवून असणाऱ्या पालकांचा मात्र चांगलाच अपेक्षाभंग झाला. सोमवारी सकाळी यादी जाहीर झाल्यानंतरही निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या काही पालकांना एसएमएस आलेच नाहीत. काही मोजक्या पालकांना निवड झाल्याचे एमएमएस आले असल्याने त्यांनी शाळांकडे प्रवेशासाठी धाव घेतली. मात्र त्यापैकी बहुतांश पालकांना एसएमएस आले नसल्याने त्यांची तारांबळ उडाली.

मनस्ताप आणि चिंता

याबाबत पालकांनी या विषयात काम करणारे डेमेक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया संस्थेकडे धाव घेतली. याबाबत संस्थेने वेबसाइटवरील माहिती तपासली. तसेच शिक्षण विभागाकडे यादी मागितली, त्यावर वेबसाइटवरील माहितीत सर्व यादी जाहीर झाल्याने पालकांना माहिती मिळाली. मात्र यादीत नाव लागूनही मंगळवापर्यंत एसएमएस न आल्याने सुरुवातीचे दोन दिवस प्रवेश न झाल्याची खंत पालकांनी व्यक्त केली. यादीत नाव आले असले तरी एसएमएस आला नाही. त्यामुळे दोन दिवस चिंतेत गेले आणि प्रवेशासाठी देण्यात येणारा काळही वाया गेला. ऑनलाइन प्रक्रियेतील गोंधळ दिवसेंदिवस वाढत असून त्याचा सर्वच पालकांना त्रास होत आहे, असे पालक नरेश पाटील यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज