अ‍ॅपशहर

थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त

शहरात अनेक वर्षांपासून वारंवार नोटिसा बजावूनही कर न भरणाऱ्या थकबाकीदारांना पहिल्यांदाच पालिकेच्या कठोर कारवाईचा सामना करावा लागत आहे. पालिकेने गुरुवारी कॅम्प नंबर ५ परिसरातील साई आर्केट या शॉपिंग कॉम्प्लेक्सला सील ठोकल्याने एकच खळबळ उडाली आहे. या शॉपिंग कॉम्पलॅक्समध्ये हॉटेल्स, एटीएम, कॉलेज या सगळ्यावर कारवाईचा परिणाम झाला आहे. या मोठ्या कारवाईमुळे शहरातील इतर थकबाकीदारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

Maharashtra Times 5 Nov 2016, 3:00 am
साई आर्केटमधील १७० मालमत्तांवर कारवाई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम property of outstanders sealed in ulhasnagar
थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त

म. टा. वृत्तसेवा, उल्हासनगर

शहरात अनेक वर्षांपासून वारंवार नोटिसा बजावूनही कर न भरणाऱ्या थकबाकीदारांना पहिल्यांदाच पालिकेच्या कठोर कारवाईचा सामना करावा लागत आहे. पालिकेने गुरुवारी कॅम्प नंबर ५ परिसरातील साई आर्केट या शॉपिंग कॉम्प्लेक्सला सील ठोकल्याने एकच खळबळ उडाली आहे. या शॉपिंग कॉम्पलॅक्समध्ये हॉटेल्स, एटीएम, कॉलेज या सगळ्यावर कारवाईचा परिणाम झाला आहे. या मोठ्या कारवाईमुळे शहरातील इतर थकबाकीदारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

उल्हासनगर महापालिकेची आर्थिक स्थिती हालाखीची असल्याने शहरातील विविध विकासकामांवर त्याचा परिणाम होत आहे. दुसरीकडे शहरातील मालमत्ताधारकांनी पालिकेच्या कर भरण्याकडे पाठ फिरवली होती. पालिकेने अभय योजना राबवत वारंवार अवधी वाढवूनही नागरिकांनी त्याला प्रातिसाद न दिल्याने पालिकेच्या तिजोरीत खडखडाट वाढतच गेला. त्यात अनेकवेळा जप्तीच्या कारवाईसाठी गेलेल्या पथकावर व्यापारी राजकारण्यांचा दबाव आणून कारवाई टाळत असत. मात्र मागील महिन्यात आयएएस दर्जाचे अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांनी पालिकेच्या आयुक्तपदाचा कारभार सांभाळताच शहरातील व्यवस्थेची बिघडलेली घडी बसवण्यासाठी प्रशासनाला कामाला लावले.

शहरातील थकबाकीदारांची यादी आणि करवसुलीची परिस्थिती पाहता त्यांनी शहरातील मालमत्ता करवसुलीसाठी आठ युनिटची स्थापना करून जप्तीची कारवाई सुरू केली आहे. आयडीआय कंपनीला सील ठोकल्यानंतर अनेक मालमत्तांच्या लिलावाच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. गुरुवारी दिवसभर सुरू असलेल्या कारवाईत जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्या पथकाने कॅम्प नंबर पाच येथील साई आर्केट या शॉपिंग कॉम्प्लेक्सला मालमत्ता कर भरण्याची नोटिस बजावली होती. मात्र कर भरण्याकडे दुर्लक्ष केल्याने साई आर्केट या शॉपिंग कॉम्प्लेक्सवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये न्यू इंग्लिश स्कूल, हॉटेल्स, विविध दुकाने, नामांकित बँकांचे एटीएम सेंटर, अशी एकूण १७० दुकाने आहेत. या जप्तीच्या कारवाईने या सगळ्या आस्थापनांवर परिणाम झाला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज