कल्याण ः बिर्ला स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी निवृत्त महिला ब्रिगेडियर नेमण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे संस्थेचे अध्यक्ष चीतलांगे यांनी शनिवारी सांगितले.
दिल्लीतील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये घडलेल्या कृत्यानंतर तर शाळेच्या सुरक्षाव्यवस्थेचा मुद्दा प्रकर्षाने चर्चेत आला. या पार्श्वभूमीवर बिर्ला स्कूल ऑफ कल्याणने सुरक्षेसाठी थेट निवृत्त महिला ब्रिगेडियर नेमणार असल्याचे स्पष्ट केले. बिर्ला स्कूलमध्ये पालकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी शाळेच्या वेबसाइटवर बीएसके ड्रॉप बॉक्स तयार करण्यात आला. या उपक्रमाचा शुभारंभ चीतलांगे यांच्या हस्ते करण्यात आला. पालकांना विद्यार्थ्यांशी निगडीत शाळेतील उपक्रमांसदर्भातील जबाबदारी कोणाकडे आहे, याची माहिती या ड्रॉप बॉक्समध्ये मिळणारच आहे, पण त्याचबरोबर तक्रार, तसेच कौतुकही या ड्रॉप बॉक्सच्या माध्यमातून करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.