अ‍ॅपशहर

आरटीओचे पारदर्शी ‘लर्निंग’

वाहन चालवण्याच्या ‘लर्निंग लायन्स’साठीची लेखी परीक्षा अधिकाधिक सुयोग्य आणि सुनियोजित पद्धतीने घेण्याचा निर्णय ठाणे प्रादेशिक आणि उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून घेण्यात आला आहे. त्याच धर्तीवर भविष्यात उमेदवारांना ‘स्टॉल सॉफ्टवेअर सिस्टीम’च्या माध्यमातून लेखी परीक्षांना सामोरे जावे लागणार आहे. ‘एमएससीआयटी’ परीक्षांप्रमाणे होणाऱ्या या प्रक्रियेत पूर्वीप्रमाणे आजूबाजूच्या उमेदवारांची उत्तरे पाहता येणार नसून प्रश्नपत्रिकाही वेगवेगळी असल्याने ‘कॉपीमुक्त’ लर्निंग लायसन्सच्या परीक्षेकडे ठाणे प्रादेशिक आणि उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सकारात्मक पाऊल टाकले जाणार आहे.

Maharashtra Times 28 Sep 2016, 4:00 am
एमएससीआयटीच्या धर्तीवर होणार वाहन परवान्याची परीक्षा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rto learning licenses exam will be more transperant
आरटीओचे पारदर्शी ‘लर्निंग’


vinit.jangle@timesgroup.com

Tweet : @vinitjangleMT

ठाणे : वाहन चालवण्याच्या ‘लर्निंग लायन्स’साठीची लेखी परीक्षा अधिकाधिक सुयोग्य आणि सुनियोजित पद्धतीने घेण्याचा निर्णय ठाणे प्रादेशिक आणि उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून घेण्यात आला आहे. त्याच धर्तीवर भविष्यात उमेदवारांना ‘स्टॉल सॉफ्टवेअर सिस्टीम’च्या माध्यमातून लेखी परीक्षांना सामोरे जावे लागणार आहे. ‘एमएससीआयटी’ परीक्षांप्रमाणे होणाऱ्या या प्रक्रियेत पूर्वीप्रमाणे आजूबाजूच्या उमेदवारांची उत्तरे पाहता येणार नसून प्रश्नपत्रिकाही वेगवेगळी असल्याने ‘कॉपीमुक्त’ लर्निंग लायसन्सच्या परीक्षेकडे ठाणे प्रादेशिक आणि उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सकारात्मक पाऊल टाकले जाणार आहे.

वयाच्या १८ वर्षांनंतर वाहन चालविण्यासाठी उमेदवारांकडून लर्निंग लायसन्स काढले जाते. त्यासाठी विविध कागदोपत्री पूर्तता केल्यानंतर उमेदवारांची लेखी चाचणी परीक्षा घेण्यात येते. यामध्ये अनेक वर्षांपासून ठाण्यातील पूर्व द्रुतगती महामार्गानजीकच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात घेण्यात येणारी उमेदवारांची लेखी चाचणी परीक्षा एका मोठ्या हॉलमध्ये घेतली जाते. त्यामध्ये ४० उमेदवारांची एकाच वेळी लेखी परीक्षा घेतली जाते. त्यामध्ये उमेदवारांसमोर असणाऱ्या प्रोजेक्टरवर दिसणाऱ्या प्रश्नांची उत्तरे त्यांना समोरील बटण दाबून द्यावी लागतात. तसेच सर्वच ४० उमेदवारांना एकाच प्रकारचे प्रश्न दर्शविण्यात येत असल्याने शेजारी बसणारे उमेदवार एकमेकांची उत्तरे पाहूनच परीक्षा देत असल्याचे वारंवार निदर्शनास येत होते. मात्र जागेची कमतरता आणि नवीन प्रणाली अस्तित्वात नसल्याने या परीक्षेला पर्याय उपलब्ध नव्हता. अखेर ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी विकास पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एमएससीआयटी’ परीक्षांप्रमाणेच लर्निंग लायसन्सची परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कार्यालय परिसरात लॅब

या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये प्रत्येक उमेदवाराला वेगवेगळी प्रश्नपत्रिकेत वेगवेगळे प्रश्न दिले जाणार असून या परीक्षांसाठी पूर्व द्रुतगती महामार्गानजीकच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयातच सुसज्ज कम्प्युटर लॅब उभारण्यात आली आहे. त्यामध्ये प्रत्येक उमेदवाराला बसण्यास स्वतंत्र कक्षाची व्यवस्था करण्यात आली असून ३० उमेदवार एकाचवेळी परीक्षा देऊ शकतात, अशी माहिती उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी ‘मटा’शी बोलताना दिली.

निकाल लगेचच

उमेदवारांची प्रश्नपत्रिका पूर्ण सोडवून झाल्यानंतर त्याठिकाणीच त्यांना निकालही पाहता येणार असल्याने त्यांच्या वेळेचीही बचत होणार असल्याची माहितीही पाटील यांनी दिली. काही तांत्रिक बाबींची पूर्तता केल्यानंतर काही दिवसांतच कम्प्युटर लॅबमधून पहिली परीक्षा घेण्यात येणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज