अ‍ॅपशहर

कोरोनाच्या धास्तीने जेष्ठ नागरिकाची आत्महत्या !

शहरातील करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे तसेच शहरातील बाधित रुग्णांच्या मृत्यूचा वाढता आकडा पाहता करोनाची लक्षणे असलेल्या आणि तपासणी केलेल्या रुग्णांमध्ये प्रचंड धास्ती आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Jul 2020, 7:39 am
म. टा. वृत्तसेवा, अंबरनाथ : शहरातील करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे तसेच शहरातील बाधित रुग्णांच्या मृत्यूचा वाढता आकडा पाहता करोनाची लक्षणे असलेल्या आणि तपासणी केलेल्या रुग्णांमध्ये प्रचंड धास्ती आहे. करोनाची लागण झाल्याच्या भीतीने अंबरनाथ पश्चिम भागातील एका ज्येष्ठ नागरिकाने तपासणी केल्यानंतर अहवाल पॉझिटीव्ह येण्याच्या भीतीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम कोरोनाच्या धास्तीने जेष्ठ नागरिकाची आत्महत्या !


अंबरनाथ पश्चिम भागातील मोरीवली येथे राहणाऱ्या ६३ वर्षांच्या जेष्ठ नागरिकाने आपल्याला करोनाची लागण झाल्याच्या भीतीने २८ जून रोजी नगरपालिकेच्या तपासणी केंद्रात तपासणी करून घेतली होती. मात्र, चाचणी अहवाल येण्याच्या आधीच त्यांनी मंगळवारी आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. करोनाच्या भीतीनेच त्यांनी हे पाऊल उचलल्याचे बोलले जाते. या प्रकरणी अंबरनाथ पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मात्र, शहरातील बाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे बाधित झालेल्या रुग्णांनी मानसिकरित्या खचून न जाता योग्य औषधोपचार घेण्याची गरज असून ज्येष्ठ नागरिकही करोनावर विजय मिळवत असल्याचे नगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. नागरिकांनी तपासणीनंतर घाबरून विपरित पाऊल न उचलता आवश्यक ती खबरदारी घेऊन सुरक्षित राहण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज