अ‍ॅपशहर

शिवसेना शहरप्रमुखांसह पाच जणांना अटक

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी उल्हासनगर पालिकेत प्रवेश नाकारल्याप्रकरणी गोंधळ घालत सुरक्षारक्षकांना मारहाण केली. याप्रकरणी शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्यासह पाच शिवसेना कार्यकर्त्यांना मध्यवर्ती पोलिसांनी अटक केली. यामुळे चिडलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांनी बाजारपेठ आणि रिक्षा बंद केल्या. यामुळे नागरिकांचे हाल झाले.

Maharashtra Times 24 Aug 2016, 3:00 am
म. टा. वृत्तसेवा, उल्हासनगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shivsena city chief arrested
शिवसेना शहरप्रमुखांसह पाच जणांना अटक

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी उल्हासनगर पालिकेत प्रवेश नाकारल्याप्रकरणी गोंधळ घालत सुरक्षारक्षकांना मारहाण केली. याप्रकरणी शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्यासह पाच शिवसेना कार्यकर्त्यांना मध्यवर्ती पोलिसांनी अटक केली. यामुळे चिडलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांनी बाजारपेठ आणि रिक्षा बंद केल्या. यामुळे नागरिकांचे हाल झाले.

रस्त्यांवरचे खड्डे, अतिक्रमण, कचऱ्याची समस्या, अधिकाऱ्यांची मुख्यालयात अनुपस्थिती, पाणीपुरवठा, अधिकाऱ्यांशी संपर्क न होणे, अशा अनेक समस्यांवर शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, युवासेना अधिकारी धीरज ठाकूर, ग्राहक संरक्षण कक्ष शहरप्रमुख जयकुमार केणी, उपशहरप्रमुख राजेंद्र शाहू आदी पदाधिकाऱ्यांनी मुख्यालय उपायुक्त डॉ. विजया कंठे यांची भेट घेतली. यावेळी पालिकेतील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश न दिल्याप्रकरणी प्रवेशद्वारावरील सुरक्षारक्षकांना मारहाण केली. खुर्च्यांची मोडतोड केली होती. याविरोधात मध्यवर्ती पोलिस ठाण्यात पालिका प्रशासनाने गुन्हा दाखल केला. अखेर पालिका सुरक्षारक्षकांना मारहाण आणि तोडफोडप्रकरणी राजेंद्र चौधरी, राजेंद्र शाहू, धीरज ठाकूर, संदीप गायकवाड, राकेश माने यांना मध्यवर्ती पोलिसांनी अटक केली. या अटकेची बातमी उल्हासनगरात पसरताच शिवसेना कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून बाजारपेठ बंद पाडत रिक्षांनाही अटकाव केला. कामगार संघटनांच्या नेत्यांच्या पुढाकाराने उल्हासनगर महापालिकेत काम बंद आंदोलन करण्यात आले होते. न्यायालयाने सायंकाळी जामीन मंजूर करीत सुटका केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज