अ‍ॅपशहर

प्रसिद्ध गायक आनंद शिंदे रुग्णालयात

छातीत दुखू लागल्याच्या तक्रारीनंतर प्रसिद्ध मराठी गायक आनंद शिंदे यांना कल्याण येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Maharashtra Times 28 May 2016, 9:37 am
मटा ऑनलाइन वृत्त । ठाणे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम singer anand shinde hospitalised after complaining chest pain
प्रसिद्ध गायक आनंद शिंदे रुग्णालयात


छातीत दुखू लागल्याच्या तक्रारीनंतर प्रसिद्ध मराठी गायक आनंद शिंदे यांना कल्याण येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

शिंदे यांच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये चार ब्लॉकेज असल्याचं वैद्यकीय तपासणीत आढळून आलं आहे. पुढील उपचारांसाठी आज त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात हलवण्यात येणार असून त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे.

आनंद शिंदे यांचा मुलगा उत्कर्ष याचं लग्न ठरलं असून लग्नासाठी उद्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज