म. टा. वृत्तसेवा, शहापूर
मुंबई-नाशिक महामार्गावरून जाणाऱ्या मोटरसायकलला भरधाव टँकरने पाठीमागून धडक दिल्याने बहीण-भावाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रक्षाबंधनाच्या रात्री आसनगाव पुलाजवळ घडली. या अपघातात या भावंडांचे वडील जखमी झाले आहेत. या घटनेतील वाहनाचा शोध पोलिसांनी लावला असून, चालक मात्र फरार आहे.
आसनगावजवळ सुविधा पेट्रोलपंपासमोर पाठीमागून येणाऱ्या टँकरने जोरदार धडक दिल्याने मोटारसायकलवरील कामिनी घरत (१४) व सचिन घरत (१०) यांचा जागीच मृत्यू झाला. तर, त्यांचे वडील प्रकाश घरत जखमी झाले. हे दोघेही शहापूर तालुक्यातील आवरे गावातील घरी जात होते.