अ‍ॅपशहर

‘अपंगसेवा’ला विशेष पुरस्कार

विरारजवळील सत्पाळा येथील पिटर मेमोरियल ट्रस्टच्या वतीने नुकतेच एका पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन सत्पाळा येथील मदर तेरेजा आश्रम येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान फादर मायकल जी यांनी भूषवले.

Maharashtra Times 5 May 2017, 5:00 am
म. टा. वृत्तसेवा, वसई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम special award for apang seva
‘अपंगसेवा’ला विशेष पुरस्कार


विरारजवळील सत्पाळा येथील पिटर मेमोरियल ट्रस्टच्या वतीने नुकतेच एका पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन सत्पाळा येथील मदर तेरेजा आश्रम येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान फादर मायकल जी यांनी भूषवले. रक्तातल्या नात्यात नसलेल्या, वंचितांची सेवा करण्याबाबत वसईतील अपंगसेवा या संस्थेला विशेष पुरस्कार देण्यात आला. सन्मानचिन्ह व २५ हजार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

अपंगसेवा संस्थेच्या सिंथिया बॅप्टिस्टा यांनी हा पुरस्कार स्वीकारला. तसेच आपल्या अंथरूणाला खिळलेल्या वडिलांची मरेपर्यंत घरात सेवा केल्याबद्दल आधुनिक श्रावणबाळ म्हणून नंदाखाल बाणभाट येथील मॅथ्यू लोपीस यांनाही पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

आपली नोकरी सांभाळून सामाजिक कार्य करणाऱ्या भाटी-नानभाट येथील स्टिफन मिनेझीस यांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या कुटुंबीयांनी हा पुरस्कार स्वीकारला. अध्यक्षीय भाषणात फा. मायकल जी यांनी पुस्कारप्राप्त व्यक्तींचे व अपंग सेवेच्या कार्याची प्रशंसा केली. समाजाच्या सकारात्मक पाठिंब्यामुळे अशा संस्थांना संजीवनी मिळत असते व त्यासाठी समाजाने अशा सामाजिक कार्यकर्त्यांच्या तसेच चांगल्या संस्थांच्या पाठिशी उभे राहावे, असे ते म्हणाले. महापौर प्रविणा ठाकूर यांनीही या कार्यक्रमात आपले विचार मांडले.

या ट्रस्टचे कार्याध्यक्ष व्हिक्टर लोबो यांनी या कार्यक्रमामागील संकल्पना मांडली. मदर तेरेजा आश्रम व प्रेरणा पाऊंडेशन करीत असलेल्या कामाविषयी त्यांनी माहिती दिली. आलेक्स परेरा यांनी पुरस्कार वितरण सोहळ्याचे सूत्रसंचालन केले तर लिनेट लोबो यांनी आभार मानले. मुख्य कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रॉबर्ट लोबो यांनी केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज