अ‍ॅपशहर

कल्याण-कसारादरम्यान आज विशेष ब्लॉक

कल्याण ते कसाऱ्यादरम्यान पादचारी पुलांच्या कामासाठी रेल्वेने विशेष मेगाब्लॉक जाहीर केला असून या काळात शहाड आणि आसनगाव रेल्वे स्थानकातील पुलावर हातोडा मारला जाणार आहे. टिटवाळ्यात नवीन पादचारी पुलाचे गर्डर टाकण्यात येणार आहेत. या कामासाठी सकाळी ११.२५ वाजल्यापासून दुपारी २.४५वाजेपर्यंत या मार्गावरील सर्व रेल्वे सेवा बंद ठेवली जाणार आहे.

MT 19 May 2019, 1:54 am
म. टा. वृत्तसेवा. कल्याण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम block


कल्याण ते कसाऱ्यादरम्यान पादचारी पुलांच्या कामासाठी रेल्वेने विशेष मेगाब्लॉक जाहीर केला असून या काळात शहाड आणि आसनगाव रेल्वे स्थानकातील पुलावर हातोडा मारला जाणार आहे. टिटवाळ्यात नवीन पादचारी पुलाचे गर्डर टाकण्यात येणार आहेत. या कामासाठी सकाळी ११.२५ वाजल्यापासून दुपारी २.४५वाजेपर्यंत या मार्गावरील सर्व रेल्वे सेवा बंद ठेवली जाणार आहे. या दरम्यान येणाऱ्या एक्स्प्रेस या नाशिकपर्यंत धावतील तर जाणाऱ्या काही एक्स्प्रेस या मेगाब्लॉक संपल्यानंतर सोडण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

मेगाब्लॉकदरम्यान लोकल सेवा बंद राहणार असून शहाड येथील जुना पादचारी पुलाचे गर्डर तोडण्यासाठी १५० मेट्रिक टन रोडक्रेनचा उपयोग रेल्वे प्रशासन करणार आहे. टिटवाळा येथील सहा मीटर रुंद नवीन पादचारी पुलाचे गर्डर टाकण्याचे काम तसेच आसनगाव रेल्वे स्थानकातील १४.७० लांबीचा जुना पादचारी पूल पाडण्याच्या कामासह रेल्वेच्या कल्याण, कसारा मार्गावरील इतर कामे या विशेष मेगाब्लॉकदरम्यान केली जाणार आहेत. प्रवाशांनी या काळात अत्यावश्यक कामाशिवाय प्रवास टाळावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे .

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज