अ‍ॅपशहर

जागृतीच्या विद्यार्थिनींनी साकारली गुढी!

शिवणाच्या मशीनवर गुढ्यांचे कापड शिवणे, कागदाच्या पुंगळ्या बनवणे, साखरेच्या गाठ्यांची माळ तयार करणे, फुलांचे हार म्हणून लोकरीचे गोंडे आणि कागदालाच पानांचा आकार देऊन फुलांचे हार तयार करणे आदी काम करण्यास जागृती पालक संस्थेची विशेष मुले मग्न होती. यंदा पहिल्यांदाच गुढीपाडव्याला या मुलांनी गुढी बनवण्याचा प्रयत्न केला आणि अप्रतिम अशा कागदी नक्षीदार गुढी तयार केल्या आहेत.

Maharashtra Times 26 Mar 2017, 4:00 am
संस्थेच्या विद्यार्थ्यांचा यंदा पहिलाच प्रयत्न
महाराष्ट्र टाइम्स.कॉम special children made a decorative gudhi
जागृतीच्या विद्यार्थिनींनी साकारली गुढी!

म. टा. वृत्तसेवा, ठाणे

शिवणाच्या मशीनवर गुढ्यांचे कापड शिवणे, कागदाच्या पुंगळ्या बनवणे, साखरेच्या गाठ्यांची माळ तयार करणे, फुलांचे हार म्हणून लोकरीचे गोंडे आणि कागदालाच पानांचा आकार देऊन फुलांचे हार तयार करणे आदी काम करण्यास जागृती पालक संस्थेची विशेष मुले मग्न होती. यंदा पहिल्यांदाच गुढीपाडव्याला या मुलांनी गुढी बनवण्याचा प्रयत्न केला आणि अप्रतिम अशा कागदी नक्षीदार गुढी तयार केल्या आहेत.

पेपर बॅग बनवणे, ब्लॉक पेंटिंग करणे, पेनस्टॅण्ड बनवणे, दिवाळीत कंदील बनवणे, पंत्यांवरती पेंटिंग करणे आदी काम ही मुले वर्षानुवर्षे करत आहेत. यातून मुलांना सक्षम बनवण्यासाठी संस्था धडपड करत असते. यंदा मुलांसाठी वेगळा उपक्रम म्हणून गुढी बनवण्याचा प्रयत्न संस्थेकडून करण्यात आला. ठाण्यातील विश्वास संस्थेच्या विद्यार्थ्यांची प्रेरणा घेऊन भाटे सरांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या तब्बल ३० ते ३५ मुलांनी गुढ्या तयार केल्या. कागदाचा लगदा तयार करण्यापासून गुढीवर नक्षीदार पेंटिंग करण्यापर्यंत सर्वच कामे विद्यार्थ्यांनी मन लावून केली. साधारण महिन्याभरापासून विद्यार्थी आणि पालक गुढ्या तयार करत होते. पहिलेच वर्ष असल्यामुळे मुलांनी जवळपास १३० गुढ्या कागदाच्या लगद्यापासून उभारल्या. कंटाळा न करता हौसेने मुलांनी गुढ्या साकारल्या.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज