अ‍ॅपशहर

तक्रार निवारणासाठी ११ समित्या

शाळांकडून होणारी पैशाची मागणी अथवा केली जाणारी अडवणूक, रखडलेले प्रवेश आणि पहिल्या यादीत नाव लागूनही अखेरपर्यंत न झालेली प्रवेशप्रक्रिया यांमुळे त्रस्त झालेल्या पालकांना दिलासा देत त्यांच्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे पाऊल उचलण्यात आले आहे. या तक्रारींची दखल घेण्यासाठी ११ तक्रार निवारण समित्यांची स्थापना करण्यात आली असून त्यांच्या माध्यमातून पालकांच्या अडचणी सोडविल्या जाणार आहेत.

Maharashtra Times 23 Mar 2017, 4:00 am
आरटीई प्रवेशाच्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाचे पाऊल
महाराष्ट्र टाइम्स.कॉम special committee for rte admission
तक्रार निवारणासाठी ११ समित्या


म. टा. वृत्तसेवा, ठाणे

शाळांकडून होणारी पैशाची मागणी अथवा केली जाणारी अडवणूक, रखडलेले प्रवेश आणि पहिल्या यादीत नाव लागूनही अखेरपर्यंत न झालेली प्रवेशप्रक्रिया यांमुळे त्रस्त झालेल्या पालकांना दिलासा देत त्यांच्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे पाऊल उचलण्यात आले आहे. या तक्रारींची दखल घेण्यासाठी ११ तक्रार निवारण समित्यांची स्थापना करण्यात आली असून त्यांच्या माध्यमातून पालकांच्या अडचणी सोडविल्या जाणार आहेत.

सहा मार्च रोजी काढण्यात आलेल्या पहिल्या आरटीई लॉटरीनंतर पालकांनी प्रवेशासाठी धावपळ केली असली तरी दुसऱ्या दिवसापासूनच प्रवेशातील गोंधळाचा अंक सुरू झाला. ज्या शाळांमध्ये प्रवेशासाठी यादी लावण्यात आली त्यापैकी काही शाळांनी जागाच नसल्याचे भासविले तर आर्थिकरित्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या या योजनेतही काही शाळांनी पालकांकडे पैशांची मागणी केली. शाळांच्या मनमानीची उदाहरणे वाढत असताना वैयक्तिक स्तरावर लढणाऱ्या पालकांना शाळा दाद लागू देत नव्हत्या. त्यासाठी अनेक पालकांनी डेमोक्रटिक युथ फेडरनेशन ऑफ इंडिया या संस्थेची मदत घेत प्रवेशप्रक्रिया सुरू केली. मात्र पालकांच्या या अडचणीच्या काळात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे कोणतीही कारवाई न झाल्याची तक्रार पालकांकडून होत असताना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे नव्या समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक तालुका तसेच महापालिका यांसाठी विविध समित्या कार्यरत करण्यात आल्या असून त्या केवळ आरटीई प्रवेशात पालकांना येणाऱ्या अडचणी, त्यांच्या समस्या यांवर काम करणार आहेत. या समित्यांकडे पालकांना थेट संपर्क साधता येणार असून त्यांच्या त्यांच्या तक्रारी दाखल करता येणार आहेत. त्या प्रत्येक तक्रारीची दखल घेतली जाणार असून सर्व तपशील शिक्शण विभागाकडे देण्यात येणार आहे.

तयारी दुसऱ्या यादीची

मार्चमध्ये सुरू झालेल्या या प्रवेशप्रक्रियेच्या पहिल्या फेरीत अनेक गोंधळ झाले. शाळांची मनमानी, रखडलेले प्रवेश, ऑनलाइन त्रुटी अशा अनेक गोंधळाचा सामना केल्यानंतर पहिली फेरी पूर्ण झाली आहे. मात्र या चुका दुसऱ्या फेरीत होऊ नयेत यासाठी या समिती नियुक्त केल्या आहेत. पहिल्यांदा पालकांना मार्गदर्शन नसल्याने हा गोंधळ झाला. मात्र, आता पालकांच्या समस्या वेळेत सोडवून दुसरी फेरी सुरळीत व्हावी, यासाठी या प्रयत्न करण्यात आला आहे. दुसऱ्या फेरीची अद्याप तारीख जाहीर झाली नसली तरी पुढील दोन दिवसांत दुसरी लॉटरी काढण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे


ज्या शाळांविरोधात या समित्यांमार्फत तक्रारी येतील, त्यांची चौकशी केली जाईल. तसेच त्या दोषी आढळल्या तर त्यांना त्याबाबत सूचना दिली जाईल आणि तरी देखील प्रवेशाबाबत त्यांची मनमानी सुरू राहिली तर त्यांची मान्यता रद्द केली जाईल.

मीना यादव, शिक्षणाधिकारी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज