अ‍ॅपशहर

सफाळे प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणासाठी व त्याचबरोबरीने नव उपक्रमशीलता जोपासणासाठी सफाळे येथील ग्रामीण शिक्षण संस्थेच्या संकुलात आयोजित केलेल्या विज्ञान, कला व सांस्कृतिक प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Maharashtra Times 20 Dec 2017, 4:11 am
म. टा. वृत्तसेवा, पालघर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम spontaneous response to exhibition
सफाळे प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद


विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणासाठी व त्याचबरोबरीने नव उपक्रमशीलता जोपासणासाठी सफाळे येथील ग्रामीण शिक्षण संस्थेच्या संकुलात आयोजित केलेल्या विज्ञान, कला व सांस्कृतिक प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील सात हजारांहून विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला हजेरी लावली.

शनिवारी सुरू झालेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन सफाळे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामीण शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष खांतीलाल दोशी, सरचिटणीस दीपक भाते, खजिनदार भरत शहा, संचालक बकूल गजेरा, नितीन वर्तक व रमाकांत पाटील, विज्ञानप्रेमी धनंजय आक्रे, प्रकाश काळे, मुख्याध्यक राजनकुमार राऊत आदी उपस्थित होते.

या प्रदर्शनात गणित व विज्ञानाचे ११४ प्रकल्प, चित्रकला २६०, हस्तकला वस्तू २०० आणि ६२ रांगोळ्यांची मांडणी करण्यात आली होती. १२ बलुतेदारांच्या देखाव्यांचा ‘ग्रामीण बाजार’ हा या प्रदर्शनाचा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. अंधश्रद्धा निर्मूलनावर आधारित हवेत तरंगणारा बाबा व त्यांचे चमत्कार सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. याशिवाय वृक्षमित्र प्रकाश काळेंचे वनस्पती प्रदर्शन, बॉटनिकल गार्डन, शेलारसरांचे ऐतिहासिक नाण्यांचे प्रदर्शन, वन्यप्राणी व फुलपाखरू प्रदर्शन, शैक्षणिक व्हिडीओ शो आदी विविध माहितीचे भांडार ठरले.

ग्रामीण शिक्षण संस्थेचे तिन्ही विभाग राजगुरू विद्यालय, इंग्रजी माध्यम शाळा व निखिल घरत कनिष्ठ महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रदर्शनाच्या यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. जिल्ह्यातून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज