अ‍ॅपशहर

संपामुळे एसटीचे ६० हजारांचे नुकसान

नुकत्याच झालेल्या नालासोपारा एस.टी. आगारातील १ दिवसाच्या संपामुळे आगाराचे अंदाजे ६० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मागील सोमवारी मध्यरात्रीपासून एस.टी आगारातील कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले होते. कर्मचाऱ्याला निलंबित केल्यामुळे हे आंदोलन करण्यात आले होते.

Maharashtra Times 24 Oct 2016, 12:46 am
म. टा. वृत्तसेवा, वसई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम st bus strike
संपामुळे एसटीचे ६० हजारांचे नुकसान


नुकत्याच झालेल्या नालासोपारा एस.टी. आगारातील १ दिवसाच्या संपामुळे आगाराचे अंदाजे ६० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मागील सोमवारी मध्यरात्रीपासून एस.टी आगारातील कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले होते. कर्मचाऱ्याला निलंबित केल्यामुळे हे आंदोलन करण्यात आले होते.

एका एस.टी वाहकाने तिकीट बॉक्स योग्य जागी न ठेवता ते विश्रांतीगृहात ठेवले होते या कारणावरून त्याला निलंबित करण्यात आले होते. हे निलंबन अन्याय्य असल्याचे सांगून हा संप पुकारण्यात आला होता. अखेर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ पालघर विभागाचे प्रभारी अधिकारी आय.एम.वन्यालोलो यांनी नालासोपारा एस.टी डेपोत येऊन आपण हे निलंबन मागे घेत असल्याचे आश्वासन दिल्यावर कर्मचाऱ्यांचे हे आंदोलन मागे घेण्यात आले होते. नालासोपारा या मोठ्या आगारातील एस.टी वाहतुकीवर संपाचा परिणाम होऊन शेकडो प्रवाशांचे हाल झाले. त्याचवेळी एक दिवसाच्या एस.टी बंदमुळे राज्य परिवहन महामंडळाला अंदाजे ६० हजार रुपयांचा महसुली तोटा आला, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. शाळेच्या विद्यार्थ्यांना व नियमितपणे एसटीने प्रवास करणाऱ्यांना अधिक त्रास झाला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज