अ‍ॅपशहर

पहिलावहिला नाट्यानुभव

मेकअप रूम, मंचावर उभारण्यात आलेले नेपथ्य, तिसऱ्या घंटेनंतर उलगडणारा पडदा आणि मंचावरील कलाकार, वर्षानुवर्ष पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात अनुभवताना बालप्रेक्षक हरखून गेले. मोखाड्यातील खोडाळा गावातील सुमारे सत्तर बालप्रेक्षकांना ठाण्यातील कलाभारती संस्थेने पहिलेवहिले नाटक पाहण्याचा अद्भुत अनुभव दिला.

Maharashtra Times 24 Jan 2017, 11:14 pm
मोखाड्यातील खोडाळा गावातील बालप्रेक्षक गेले हरखून
महाराष्ट्र टाइम्स.कॉम student for village in thane theatre
पहिलावहिला नाट्यानुभव


म. टा. वृत्तसेवा, ठाणे

मेकअप रूम, मंचावर उभारण्यात आलेले नेपथ्य, तिसऱ्या घंटेनंतर उलगडणारा पडदा आणि मंचावरील कलाकार, वर्षानुवर्ष पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात अनुभवताना बालप्रेक्षक हरखून गेले. मोखाड्यातील खोडाळा गावातील सुमारे सत्तर बालप्रेक्षकांना ठाण्यातील कलाभारती संस्थेने पहिलेवहिले नाटक पाहण्याचा अद्भुत अनुभव दिला.

शहरातील लहानग्यांना चित्रपट, नाटक, कार्यक्रम यांचा अनुभव पालकांसह लहानपणापासून घेता येतो. मल्टिप्लेक्स अथवा सुसज्ज नाट्यगृह येथे नियमितपणे हजेरी लावत बालप्रेक्षकही चित्रपटांसह मराठी नाट्यकृतीही पाहतात. मात्र ज्यांच्या गावी नाट्यगृह नाही, जेथे कलाकार फिरकत नाही अथवा मनोजंनासाठी टीव्हीशिवाय दुसरे साधन नाही, अशा विद्यार्थ्यांपर्यंत नाटक पोहोचवण्याचा आगळावेगळा उपक्रम ठाण्यातील कलाभारती संस्थेतर्फ करण्यात आला. मोखाड्यातील खोडाळ या लहानशा गावातील कुडाळ माध्यमिक शाळेच्या सुमारे सत्तर विद्यार्थ्यांना सहलीसाठी ठाणे परिसरात आणण्यात येणार होते. शहरातील प्रेक्षणीय स्थळांसह या विद्यार्थ्यांना नाटकाचा प्रयोग दाखवावा, अशी कल्पना शाळेतील शिक्षकांनी मांडली. या गावात एकही नाट्यगृह नसल्याने नाटक म्हणजे काय, असा प्रश्न शिक्षकांना विद्यार्थ्यांकडून नेहमी विचारण्यात येतो. लहानपणापासून एकदाही नाटक पाहण्याची संधी न मिळालेल्या विद्यार्थ्यांना यानमित्ताने पहिला अनुभव देण्याची ही कल्पना शिक्षकांनी कलाभारती संस्थेच्या सुरेंद्र दातार यांपुढे मांडली. विद्यार्थ्यांना पहिला नाट्यानुभव दिल्याचे अत्यंत समाधान मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

सामग्रीची तोंडओळख

चंद्रलेखा नाट्यसंस्थेला पन्नास वर्ष पूर्ण होत असल्याने संस्थेचे माजी मॅनेजर आणि रंगकर्मी सुरेंद्र दातार हे त्यांच्या कलाभारती संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवित आहेत. यानिमित्ताने बालप्रेक्षकांना नाटकाचा पहिला अनुभव देण्याची कल्पना त्यांनी उचलून धरली आणि गडकरी रंगायतन येथे आईचे पत्र हरवले हे श्वेता पेंडसे लिखित नाटक बालप्रेक्षकांना अनुभवता आले. हे सर्व विद्यार्थी आठवी ते दहावी या वयोगटातील असून त्यांनी आयुष्यातील हे पहिलेच नाटक पाहिले. यावेळी संस्थेतर्फे या नव्या बाल प्रेक्षकांना नाट्यगृह, कलाकार, नाटकासाठी वापरण्यात येणारी सामग्री यांची तोंडओळखही करून देण्यात आली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज