अ‍ॅपशहर

विद्यार्थिनीच्या अपहरणाचा प्रयत्न

अल्पवयीन शाळकरी मुलीला भररस्त्यात चाकू दाखवून तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना वसईत घडली असून याप्रकरणी माणिकपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ४ अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

Maharashtra Times 14 Feb 2018, 12:38 pm
म. टा. वृत्तसेवा, वसई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम student hijack attempt
विद्यार्थिनीच्या अपहरणाचा प्रयत्न


अल्पवयीन शाळकरी मुलीला भररस्त्यात चाकू दाखवून तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना वसईत घडली असून याप्रकरणी माणिकपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ४ अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिस निरीक्षकांनी सांगितले.

वसई रोड पश्चिमेला माणिकपूर भागात असलेल्या के. टी. व्हिजन सिनेमागृहाजवळील गल्ली परिसरात सोमवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणातील १३ वर्षीय शाळकरी मुलगी आठवी इयत्तेत शिकते. ती सकाळी शाळेत जाण्यासाठी पायी निघाली होती. त्यावेळी चार मोटारसायकलवर बसून ८ मुले आली. या मुलांनी या मुलीची छेड काढून तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. या मुलीला सोबत येण्याची जबरदस्ती करण्यात आली व तिला चाकूचा धाकही त्यांनी दाखवला. मुलीने आरडाओरडा केल्यानंतर शेजारून जाणाऱ्या एका व्यक्तीने मुलांना अडविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ती मुले पळून गेली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

घडलेल्या घटनेबाबत पीडित मुलीने पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. याप्रकरणी तपास सुरू असून मुलीची छेडछाड करणारे आरोपीही अल्पवयीन आहेत. त्या चार अल्पवयीन आरोपींना ताब्यात ठेवले असून चौकशी करण्यात येत आहे, असे माणिकपूर पोलिस निरीक्षकांनी सांगितले.

छेडछाड, अपहरणाचा प्रयत्न या कलमान्वये माणिकपूर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. घडलेल्या घटनेने मुलगी घाबरली असून यापूर्वीही आरोपींनी पीडित मुलीचा पाठलाग व छेडछाड केल्याची माहितीही समोर आली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज