अ‍ॅपशहर

डहाणूत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

सार्वजनिक गणेशोत्सवातील नृत्य कार्यक्रमाची तयारी करीत असलेल्या एका १३वर्षीय मुलीवर डहाणूमध्ये बलात्कार झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. आरोपीचा पोलिस शोध घेत आहे.

Maharashtra Times 20 Sep 2018, 1:56 am
म. टा. वृत्तसेवा, पालघर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम teenage girl raped in dahanu
डहाणूत अल्पवयीन मुलीवर बलात्कार


सार्वजनिक गणेशोत्सवातील नृत्य कार्यक्रमाची तयारी करीत असलेल्या एका १३ वर्षीय मुलीवर डहाणूमध्ये बलात्कार झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. आरोपीचा पोलिस शोध घेत आहे.

डहाणू तालुक्यातील वडकून येथील गणेशोत्सव मंडळाच्या सामूहिक नृत्य कार्यक्रमाची आपल्या मैत्रिणींसोबत तयारी करीत असलेल्या या मुलीला अजित राजेश गौंड (२०) याने बोलावले. त्याने तिला गावातीलच रमण माच्छी तलावाजवळ नेले. तेथे जिवे ठार मारण्याची धमकी देत अंधाराचा फायदा घेत अजितने बलात्कार केला. या घटनेनंतर भेदरलेल्या या मुलीने पालकांना ही घटना सांगितली. त्यानंतर त्यांनी मंगळवारी संध्याकाळी डहाणू पोलिस ठाणे गाठले व अजितविरोधात तक्रार केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज