अ‍ॅपशहर

मीरा रोड: 'त्या' मृत व्यक्तीचा अहवाल करोना पॉझिटिव्ह

मीरा रोड येथील एका ५५ वर्षीय व्यक्तीचा करोनाच्या संसर्गामुळं मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. या रुग्णावर मुंबईतील नायर रुग्णालयात उपचार सुरू होते. २९ एप्रिलला या रुग्णाचा मृत्यू झाला होता.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 May 2020, 3:10 pm
ठाणे: मीरा रोड येथील एका ५५ वर्षीय व्यक्तीचा करोनाच्या संसर्गामुळं मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. मुंबईतील रुग्णालयात २९ एप्रिल रोजी या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्याचा चाचणी अहवाल प्राप्त झाला असून, तो करोनाकरिता पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळं मीरा-भाईंदर परिसरातील हा तिसरा करोनाबळी ठरला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम corona1_pti


करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं मीरा-भाईंदरच्या नागरिकांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. २९ एप्रिल रोजी मृत्यू झालेल्या व्यक्तीचा चाचणी अहवाल शुक्रवारी प्राप्त झाला आणि तो करोनाकरिता पॉझिटिव्ह आला आहे. तर दुसरीकडे करोनाच्या तीन नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. हे सर्व रुग्ण नवीन परिसरातील आहेत. त्यामुळं चिंता आणखीनच वाढली आहे.

तत्पूर्वी, करोनामुळं मृत्यू झालेली व्यक्ती ही मीरा रोडमधील नया नगर परिसरातील रहिवासी होती. नायर रुग्णालयात त्या व्यक्तीवर उपचार सुरू होते. तो वाहनं दुरुस्त करण्याचा काम करत असे. त्याचा शुक्रवारी चाचणी अहवाल प्राप्त झाला. त्यात तो करोना पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळं करोनानं मृत्यू झालेल्यांची संख्या आता तीनवर पोहोचली आहे.

मीरा-भाईंदर क्षेत्रातील करोना रुग्णांची संख्या आता १६१ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत ४५ रुग्ण बरे झाले असून, त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे.

पालघर मॉब लिंचिंग: कोठडीतील आरोपीला करोना

करोनाचे संकट गडद

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज