मटा ऑनलाइन वृत्त । ठाणे
कल्याणमधील काही तरुण आयसिस या दहशतवादी संघटनेत सामील झाल्याच्या घटनेला वर्षही होत नाही, तोच ठाण्यातील आणखी एक तरुण आयसिसमध्ये सामील झाल्याचे वृत्त आहे. या २४ वर्षीय तरुणाचे नाव तरबेज असे असून या प्रकरणाचा ठाणे एटीएस तपास करत आहे.
नोकरीसाठी जातो, असे सांगून तरबेज इजिप्तला गेला. त्यानंतर आजतागायत त्याचा एकही फोन आला नाही. त्याला वारंवार फोन केल्यानंतरही त्याचा फोन लागत नसल्याचे त्याच्या भावाने सांगितले. तरबेज एकटाच गेला नसून मुंब्रा येथील अली नावाचा त्याचा मित्रही त्याच्या सोबत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अलीच्या प्रभावाखाली येऊनच तरबेजने आयसिसची वाट धरल्याचेही सांगण्यात येते. दोघेही उच्चशिक्षित असून हे दोघेच आयसिसला गेले की त्यांच्या सोबत आणखी कोणी आहे, याबाबतचा एटीएस तपास करत आहे.