अ‍ॅपशहर

साखळीचोरी, घरफोड्या करणारी चौकडी अटकेत

घरफोडी तसेच सोनसाखळी चोरणाऱ्या चौघांना ठाणे पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे कक्षाने अटक केली आहे. आरोपींच्या चौकशीत सोनसाखळी चोरीचे ५ तर घरफोडीचे ७ गुन्ह्यांची उकल झाली असून एकूण २४९ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि मोटारसायकली असा एकूण ९ लाख ९१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Maharashtra Times 20 Jan 2018, 2:40 am
म. टा. वृत्तसेवा, ठाणे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम home


घरफोडी तसेच सोनसाखळी चोरणाऱ्या चौघांना ठाणे पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे कक्षाने अटक केली आहे. आरोपींच्या चौकशीत सोनसाखळी चोरीचे ५ तर घरफोडीचे ७ गुन्ह्यांची उकल झाली असून एकूण २४९ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि मोटारसायकली असा एकूण ९ लाख ९१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सोनसाखळी चोरीसाठी चोरटे चोरीच्या मोटारसायकलचा वापर करत असल्याची बाब चौकशीत समोर आली आहे.

सोनसाखळीबरोबर वाहन चोरणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी दिल्या होत्या. त्यानुसार मालमत्ता गुन्हे कक्षाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यशवंत चव्हाण यांच्या पथकाने तांत्रिक पद्धतीने तपास करत यदुल्ला कंबरअली जाफरी (२६) आणि महंमदअली नादरअली जाफरी (२३) रा. पिराणीपाडा, भिवंडी या दोघांना अटक केली. दोघेही इराणी असून त्यांच्या चौकशीत सोनसाखळी चोरीसाठी चोरीच्या मोटारसायकलींचा वापर केला जात असल्याची बाब समोर आली. तसेच नौपाडा, कासारवडवली, कापूरबावडी, डोंबिवली आणि खडकपाडा या पोलिस ठाण्याच्या हद्दीत पाच सोनसाखळी चोऱ्या केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. या गुन्ह्यात ५ लाख ९४ हजार रुपायांचे १९८ ग्रॅम दागिने आणि ३ मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. तसेच शिळ-डायघरमधून घरफोड्या करणाऱ्या अनुराग रवी सिसोदिया (२५) आणि कलीम नवाब अहमद खान (३०) रा. डायघरगाव यांना अटक करण्यात आली. शिळडायघरसह खडकपाडा, कोळशेवाडी, अंबरनाथ, मानपाडा, वागळे इस्टेट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सात घरफोडीच्या गन्ह्यातील १ लाख ५३ हजार रुपायांचे ५१ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज