अ‍ॅपशहर

गॅस्ट्रोचा विळखा

वाढत्या उन्हाचा दाह, तापमानात सातत्याने होणारी वाढ यांमुळे एप्रिल महिन्यात बालकांना गॅस्ट्रोचा विळखा बसल्याचे दिसून आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा तापमानात अधिक वाढ झाल्याने गॅस्ट्रोच्या रुग्णांच्या संख्येमध्ये तीस टक्के वाढ झाली आहे.

Maharashtra Times 28 Apr 2017, 4:01 am
बालरुग्णांच्या संख्येत एप्रिलमध्येच मोठी वाढ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम thane gastro spreads in heat
गॅस्ट्रोचा विळखा


म. टा. वृत्तसेवा, ठाणे

वाढत्या उन्हाचा दाह, तापमानात सातत्याने होणारी वाढ यांमुळे एप्रिल महिन्यात बालकांना गॅस्ट्रोचा विळखा बसल्याचे दिसून आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा तापमानात अधिक वाढ झाल्याने गॅस्ट्रोच्या रुग्णांच्या संख्येमध्ये तीस टक्के वाढ झाली असून मलेरिया, टायफॉइड यांच्यापेक्षाही गॅस्ट्रोचे प्रमाण वाढल्याचा अनुभव डॉक्टरांना येत आहे.

दरवर्षी उन्हाळ्यात ताप, टायफॉईड या आजारांचे प्रमाण लहान मुलांमध्ये अधिक दिसून येते. मात्र यंदा गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. बहुतांश मुलांना उलट्या आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण घटणे या तक्रारी जाणवत आहेत. त्याकडे वेळीच लक्ष न दिल्यास आजाराचे गांभीर्य वाढते. परीक्षा संपल्याने मुले उन्हात खेळतात. अनेकदा अस्वच्छ पाण्याचे सेवन केले जाते. उघड्यावरील अनेक पदार्थ खाल्ले जातात. अनेकदा गरजेपेक्षा कमी पाण्याचे सेवनही मुलांकडून कमी प्रमाणात केले जाते. उलट्या, जुलाब आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण घटणे अशा अनेक तक्रारी लहानग्यांकडून केल्या जातात.

दरवर्षी उन्हाळ्यात अशा आजारांचे प्रमाण दिसून येत असले, तरी यंदा एप्रिल महिन्यांपासूनच रुग्णांची संख्या वाढल्याची नोंद डॉक्टरांकडून ठेवण्यात आली आहे. मे महिन्यात पुन्हा ही संख्या वाढण्याची भीती डॉक्टर व्यक्त करतात.

मुलांचे आरोग्य हे पालकांच्या हाती असल्याने पालकांनी याबाबत दक्षता घ्यावी. शरीरातील पाण्याचे घटणारे प्रमाण ही गंभीर बाब असल्याने त्याकडे दुर्लक्ष करू नये. त्यासह कोणतीही लक्षणे आढळल्यास वैद्यकीय सल्ला वेळेत घ्यावा. त्यामुळे आजार वाढणार नाही. यंदा मात्र बालरुग्णांमध्ये गॅस्ट्रोच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे.

- डॉ. हेमराज इंगळे,

बालरोग तज्ज्ञ

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज