मटा ऑनलाइन वृत्त । अंबरनाथ
लूटमार करण्याच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांनी एका तरुणावर गोळीबार केल्याची घटना मंगळवारी रात्री अंबरनाथमध्ये घडली. चोरट्यांच्या हल्ल्यात आकाश घोडके (१९) हा तरुण जखमी झाला.
आकाश हा रात्री आठच्या सुमारास लोकनगरी मैदानात त्याच्या मैत्रिणीसोबत गप्पा मारत उभा होता. यावेळी अचानक काही जणांनी येऊन हवेत गोळीबार केला आणि त्यांच्याकडे पैशांच्या पाकिटाची मागणी केली. पाकिट घेतल्यानंतर त्याच्या हातावर गोळीबार करून ते पसार झाले. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.