अ‍ॅपशहर

केळवे: बुडालेल्या तरुणांचे मृतदेह हाती

केळवे पर्यटनस्थळी रविवारी दुपारी नालासोपारा येथील चार पर्यटकांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला होता. त्यातील दोघांचे मृतदेह आधीच सापडले असून दीपेश पेडणेकर व श्रीतेज नाईक या दोघांचे मृतदेह मंगळवारी स्थानिक आदिवासी व मच्छिमारांच्या हाती लागले.

Maharashtra Times 20 Jun 2018, 7:16 am
म. टा. वृत्तसेवा, पालघर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम the body of the lost youths are found
केळवे: बुडालेल्या तरुणांचे मृतदेह हाती


केळवे पर्यटनस्थळी रविवारी दुपारी नालासोपारा येथील चार पर्यटकांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला होता. त्यातील दोघांचे मृतदेह आधीच सापडले असून दीपेश पेडणेकर व श्रीतेज नाईक या दोघांचे मृतदेह मंगळवारी स्थानिक आदिवासी व मच्छिमारांच्या हाती लागले.

नालासोपारा (पूर्व) येथील संतोष भुवन येथून दहावी आणि बारावीपर्यंत शिक्षण घेतलेले आणि अत्यंत गरीब कुटुंबातील दीपक चालवादी (२०), दीपेश पेडणेकर (१७), श्रीतेज नाईक (१५), तुषार चिपटे (१५), गौरव सावंत (१७), संकेत जोगळे (१७) आणि देविदास जाधव (१६) असे ७ अल्पवयीन मित्र रविवारी सकाळी केळवे येथे आले होते. यापैकी चार जण समुद्रात बेपत्ता झाले. या तरुणांचा शोध घेण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कमी पडल्याची बातमी प्रसिद्ध केल्यानंतर त्याची दखल घेत तटरक्षक दलाने या तरुणांच्या शोधासाठी तब्बल तिसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी हेलिकॉप्टरचा वापर केला, मात्र त्यांना यश न आल्याने हेलिकॉप्टर माघारी नेण्यात आले.

दीपक चालवादी याचा मृतदेह रविवारी सापडला, तर तुषार चिपटे याचा मृतदेह सोमवारी पहाटे सहा वाजता दादर पाड्याच्या खाडीकिनारी सापडला. मंगळवारी पहाटे श्रीतेज नाईक याचा मृतदेह वडराई खाडीच्या पुढे असलेल्या क्रिकेट मैदानासमोर समुद्र किनाऱ्यावरील दगडाच्या कपारीजवळ स्थानिक आदिवासी व मच्छिमारांना आढळून आल्यावर त्यांनी पोलिसांना कळविले. श्रीतेजच्या आजीने ओळख पटवल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले व मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. वडराई येथेच मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दीपेश पेडणेकर याचा मृतदेह केळव्याच्या दादरा पाडा येथील खाडीजवळ मंगळवारी दुपारी तीनच्या दरम्यान स्थानिक आदिवासी व मच्छिमारांना आढळून आला. दीपेशवरही तेथेच अंत्यसंस्कार करण्यात आले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज