अ‍ॅपशहर

बदलापुरात वडापावमध्ये मृत पाल

अंबरनाथ येथील 'बबन वडापाव' या वडापाव विक्रेत्याच्या वडापावमध्ये मृत पाल आढळल्याची घटना ताजी असतानाच, आता बदलापूर येथील 'ओम साई खिडकी वडापाव' या स्नॅक्स कॉर्नरमध्ये ग्राहकाला वडा खाताना त्यात मृत पाल आढळली आहे. या घटनेमुळे बदलापूरमधील खवय्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Maharashtra Times 13 Sep 2018, 5:44 am
म. टा. वृत्तसेवा, बदलापूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम the dead sail in the vada pav
बदलापुरात वडापावमध्ये मृत पाल


अंबरनाथ येथील 'बबन वडापाव' या वडापाव विक्रेत्याच्या वडापावमध्ये मृत पाल आढळल्याची घटना ताजी असतानाच, आता बदलापूर येथील 'ओम साई खिडकी वडापाव' या स्नॅक्स कॉर्नरमध्ये ग्राहकाला वडा खाताना त्यात मृत पाल आढळली आहे. या घटनेमुळे बदलापूरमधील खवय्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बदलापूर पोलिस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंबरनाथ येथील शिवाजी चौकात असलेल्या बबन वडापावच्या वडापावमध्ये मृत पाल आढळल्याचा प्रकार समोर आला होता. मात्र मंगळवारी अशाच पध्दतीने बदलापूरमध्ये एका वडापावमध्ये मृत पाल आढळल्याचा व्हीडिओ सोशल मिडीयावर फिरत होता. मात्र या फोटोबाबत नागरिकांमध्ये संभ्रम होता. अखेर या सोशल मिडीयावरील या व्हीडिओच्या आधारे तपास करत बदलापूर नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित वडापावच्या दुकानाला भेट देऊन माहिती घेतली. त्यावेळी ओम साई खिडकी वडापाव या स्नॅक्स कॉर्नरचालकांचा मुलगा शैलेश चौधरी याने आपल्या दुकानातील वडापावमध्ये पाल आढळल्याचे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसमोर मान्य केले.

अखेर नगरपालिकेच्या आरोग्या विभागाकडून हे वडापाव केंद्र बंद करत पंचनामा करण्यात आल्याची माहिती नगपालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलिस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक लक्ष्मण सारीपुत्रे यांनी दिली. अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे देखील याबाबत तक्रार करण्यात आली आहे. मात्र अंबरनाथपाठोपाठ बदलापूरसारख्या शहरातही वडापावमध्ये पाल आढळल्याने खवय्यांमध्ये मात्र संतापाचे वातावरण आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज