अ‍ॅपशहर

कौस्तुभ राणे यांच्यावर आज अंत्यसंस्कार

शहीद मेजर कौस्तुभ प्रकाशकुमार राणे यांच्यावर आज, गुरुवारी सकाळी १० वाजता मिरारोड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत, असे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून बुधवारी सांगण्यात आले. शहीद राणे यांचे पार्थिव आज पहाटे ६ ते सकाळी ९ वाजेपर्यंत त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे.

Maharashtra Times 9 Aug 2018, 4:13 am
म. टा. वृत्तसेवा, भाईंदर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rane

शहीद मेजर कौस्तुभ प्रकाशकुमार राणे यांच्यावर आज, गुरुवारी सकाळी १० वाजता मिरारोड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत, असे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून बुधवारी सांगण्यात आले. शहीद राणे यांचे पार्थिव आज पहाटे ६ ते सकाळी ९ वाजेपर्यंत त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे.

काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांची घुसखोरी रोखताना मंगळवारी मेजर कौस्तुभ राणे यांच्यासह चार जवान शहीद झाले. मेजर राणे यांचे पार्थिव बुधवारी श्रीनगर येथून विमानाने दु. २.१५ वाजता दिल्लीला पोहोचले. तिथून विमानाने ते संध्याकाळी मुंबईत आणण्यात आले. बुधवारी रात्रभर मालाड येथे शवगृहामध्ये ठेवण्यात येऊन आज, गुरुवारी पहाटे ते त्यांच्या मिरारोड येथील निवासस्थानी नेले जाणार आहे. सकाळी १० वाजता शहीद राणे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. बुधवारी शिक्षणमंत्री विनोद तावडे, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर, नातेवाईक, मित्र परिवार यांनी राणे कुटुंबीयांच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज