अ‍ॅपशहर

वीज बिल भरणा केंद्रात चोरी

पश्चिमेकडील पारनाका परिसरातील महावितरणच्या वीज बिल भरणा केंद्रामधून अज्ञात चोरट्याने ६४ हजारांची रोकड लंपास केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली.

Maharashtra Times 23 Mar 2017, 3:00 am
कल्याण : पश्चिमेकडील पारनाका परिसरातील महावितरणच्या वीज बिल भरणा केंद्रामधून अज्ञात चोरट्याने ६४ हजारांची रोकड लंपास केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम theft in mahavitaran bill collection center
वीज बिल भरणा केंद्रात चोरी


वीज बिल भरणा केंद्राचा दरवाजा एका अज्ञात व्यक्तीने ठोठावत थेट केबिनमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्याने स्वतःजवळील पेपर एका टेबलावर ठेवून तेथील महिलेला या पेपरवर स्टँप मारण्यास सांगितले. तिची नजर चुकवून केंद्रात पेटीत जमा असलेली ६४ हजारांची रोकड लंपास केली. रोकड चोरीस गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर महिलेने बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज