अ‍ॅपशहर

कल्याणात उद्या पाणी नाही

मोहिली जलशुद्धीकरण केंद्रात देखभाल-दुरुस्तीचे काम केडीएमसी बुधवारी हाती घेणार आहे. त्यामुळे बुधवारी सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत पाण्याचा शटडाऊन घेतला जाणार आहे.

Maharashtra Times 31 Jul 2018, 1:58 am
कल्याण : मोहिली जलशुद्धीकरण केंद्रात देखभाल-दुरुस्तीचे काम केडीएमसी बुधवारी हाती घेणार आहे. त्यामुळे बुधवारी सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत पाण्याचा शटडाऊन घेतला जाणार आहे. मोहिली जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा होणाऱ्या टिटवाळा, उंबर्णी, बल्याणी, मोहिली, जेतवननगर, तिपन्नानगर, गाळेगांव, गणेश कॉलनी, पंचशीलनगर, शास्त्रीनगर, फुलेनगर, मोहना, शहाड, वडवली, अटाळी, आंबिवली, शहाड, रामबाग, चिकणघर, घोलपनगर, मिलिंदनगर, योगीधाम, मुरबाड रोड, वालधुनी, जोशीबाग व कल्याण स्थानक परिसरात पाणीपुरवठा केला जाणार नाही. या परिसरातील रहिवाशांनी पाण्याचा साठा करून ठेवावा, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम no-water

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज