अ‍ॅपशहर

ज्वेलरी शॉपच्या बाजूनं दुकान भाड्यानं घेतलं, बोगदा खणून घुसला; पण भलताच गेम झाला

Thane Theft: दागिन्यांच्या दुकानात चोरी करण्यासाठी चोरट्यानं बोगदा खणला. त्यासाठी त्यानं दागिन्यांच्या दुकानाशेजारी असलेलं दुकान भाड्यानं घेतलं. परिसरातील दुकानं बंद असतात त्या दिवशी चोरी करायची असं चोरानं ठरवलं. मात्र अचानक त्याचा प्लान फसला आणि तो पकडला गेला.

Authored byकुणाल गवाणकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Jan 2023, 10:49 am
ठाणे: दुकानात चोरी होऊ नये म्हणून दुकानदार, मालक अनेक मार्गांचा वापर करतात. सिक्युरिटी कॅमेरे, अत्याधुनिक कुलूप, हाय टेक अलार्म वापरून चोरी टाळण्याचा दुकानदारांचा प्रयत्न असतो. मात्र मुंबईत एका चोरट्यानं चोरी करण्यासाठी वेगळाच जुगाड केला. सोनाराच्या दुकानात चोरी करण्यासाठी त्यानं त्याच्या शेजारी असणारं दुकान भाड्यानं घेतलं आणि बोगदा खणला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम thane crime


ठाण्यात भवानी ज्वेलर्स नावाचं दुकान आहे. काही दिवसांपूर्वी आरोपीनं भवानी ज्वेलर्सच्या शेजारचं दुकान भाड्यानं घेतलं. तिथे फर्निचरचं काम सुरू केलं. या दरम्यान आरोपीनं दागिन्यांच्या दुकानापर्यंत बोगदा खणला. अवघ्या तीन दिवसांत दागिन्यांच्या दुकानात जाण्यासाठी भूमिगत रस्ता तयार करण्यात आला.
जानू, कुठे आहेस? लाडिक आवाजात पत्नीची विचारणा; उत्तर देताच पतीचा जीव गेला
९ जानेवारीला चोरी करण्याची योजना आखण्यात आली. कारण त्या दिवशी परिसरातील बरीचशी दुकानं बंद होती. चोरानं पूर्ण योजना आखली होती. दुपारच्या सुमारास तो बोगद्यातून दुकानात शिरला. त्यानं इथेतिथे पाहिलं आणि थेट तिजोरीच्या दिशेनं गेला. त्यानं काही वस्तूही चोरल्या. त्याचवेळी काही कामास्तव मालिक दुकानात पोहोचला. मालकानं चोरट्याला रंगेहात पकडलं आणि त्याला बेदम मारलं. यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. ठाणे पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना अटक केली आहे.
एक सवय चोरट्यांना पडली भारी, हाती पडली पोलिसांची बेडी; सवयीप्रमाणे 'तिथे' गेले अन् सापडले
घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. त्यात चोर बोगद्यातून आत शिरुन सामान चोरताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बोगदा तयार करून चोरी करण्याची कल्पना काही नवी नाही. एप्रिल २०२० मध्ये मुंबईत चोरट्यांनी लॉकडाऊनचा फायदा घेत बोगदा तयार करून दागिन्यांच्या दुकानात चोरी केली होती. मुंबईच्या पश्चिम उपनगरात असलेल्या अंधेरीत ही घटना घडली होती. त्याआधी २०१७ मध्ये एस व्ही रोड परिसरात चोरट्यांनी २५ दिवसांत ६ फूट लांब बोगदा तयार केला होता. मात्र बोगदा तयार करताना होणारा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी आरोपींना अटक केली.
लेखकाबद्दल
कुणाल गवाणकर
महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.... आणखी वाचा

महत्वाचे लेख