वसई : विरार रेल्वे स्थानकावर लोकलसमोर 'किकी डान्स' करून जीव धोक्यात घालणाऱ्या एका तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. विरार आरपीएफने याप्रकरणी निशांत शाह (२०), ध्रुव शाह (२३), श्याम शर्मा (२४) या तीन तरुणांना अटक करून वसई रेल्वे न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने वसई स्थानकाची स्वच्छता करण्याची शिक्षा सुनावली. तसेच असे जीवघेणे प्रयोग कोणीही करू नये, यासाठी तिघांनी जनजागृती करावी, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
किकी डान्सः स्थानक स्वच्छता करण्याची शिक्षा
विरार रेल्वे स्थानकावर लोकलसमोर 'किकी डान्स' करून जीव धोक्यात घालणाऱ्या एका तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
Maharashtra Times 10 Aug 2018, 1:26 am