अ‍ॅपशहर

वाहनचोरीप्रकरणी तिघांना अटक

वाडा तालुक्यात चोऱ्या, घरफोडी व वाहनचोरीप्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून वाड्यात चोऱ्या, घरफोडी व वाहनचोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

Maharashtra Times 22 Feb 2018, 2:15 pm
म. टा. वृत्तसेवा, पालघर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम three wheeler stolen arrest
वाहनचोरीप्रकरणी तिघांना अटक


वाडा तालुक्यात चोऱ्या, घरफोडी व वाहनचोरीप्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून वाड्यात चोऱ्या, घरफोडी व वाहनचोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तालुक्यातील खुपरी येथील सीताराम भोईर यांनी १७ फेब्रुवारी रोजी मोटारसायकल दारातून चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली होती. त्याच अनुशंगाने वाडा पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

सागर सवरा (२०, रा. ब्राम्हणगाव ता. वाडा), विजय नडगे (२९) व रितेश गवारी (२२, रा. म्हसरोली ता. विक्रमगड), अशी अटक केलेल्या तरुणांची नावे असून त्यांच्याकडून एक होंडा कंपनीची ड्रीम युगा ही मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. अन्य चोऱ्यांची उकल होण्याची शक्यता तपास अधिकारी सहा. पोलिस निरीक्षक गणेश माळी यांनी वर्तवली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज