अ‍ॅपशहर

ठाणे महापालिकेची मोठी कारवाई; ५ रेस्टॅारंट सील

सुरक्षित वावर, मास्क आणि सॅनिटायजरचा वापर आदी करोना संदर्भातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ठाण्यातील दोन ऑर्केस्ट्रा बारसह एकूण पाच रेस्टॅारंट बारवर महापालिकेने कारवाई करत हे पाचही बार सील केले.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 24 Feb 2021, 4:42 pm
म. टा. प्रतिनिधी, ठाणेः सुरक्षित वावर, मास्क आणि सॅनिटायजरचा वापर आदी करोना संदर्भातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ठाण्यातील दोन ऑर्केस्ट्रा बारसह एकूण पाच रेस्टॅारंट बारवर महापालिकेने कारवाई करत हे पाचही बार सील केले. पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशानंतर सोमवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम tmc take strict action on 5 restaurant over coronavirus pandemic
ठाणे महापालिकेची मोठी कारवाई; ५ रेस्टॅारंट सील


करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करून नये. मास्क वापरण्यासोबत सुरक्षित वावराचा नियम पाळणे बंधनकारक असून या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना तात्काळ सील करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दोनच दिवसांपूर्वी दिले होते. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पथकाने छापे टाकून ही कारवाई केली. या कारवाईअंतर्गत नौपाडा आणि माजिवडा मानपाडा प्रभाग समितीअंतर्गत दोन ऑर्केस्ट्रा बारसह एकूण पाच बारवर धडक कारवाई करण्यात आली.

एलबीएस रोडवरील शिल्पा बार हा ऑर्केस्ट्रा बार सील करण्यात आली. त्याचबरोबर कापूरबावडी येथील सन सिटी या ऑर्केस्ट्रा बारसह हिरानंदानी इस्टेटमधील टीआरपी लाऊंज, पोप टेटस् आणि मायझो हे तीन बारही सील करण्यात आले. अतिक्रमण विभागाचे उपायुक्त अशोक बुरपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या पाचही आस्थापनांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांची गय केली जाणार नाही, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज