अ‍ॅपशहर

अखेर महापालिका मुख्यालयाचा पत्ता बदलला

निवडणुकीनंतर ठाणे महापालिकेत सत्ताबदल होणार की नाही, हे येत्या २३ तारखेलाच समजणार असले तरी ठाणे महापालिकेचा पत्ता मात्र आता बदलला आहे. पालिका मुख्यालय नव्या ठिकाणी स्थलांतरित करण्याचा कोणताही प्रयत्न सुरू नाही. मात्र, आजवर ठाणे महापालिका मुख्यालय, अल्मेडा रोड, पाचपाखाडी या पालिकेच्या पत्यावर आता अल्मेडा रोड ऐवजी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग असा बदल करण्यात आला आहे. ठाण्यातील ज्येष्ठ आणि सजग नागरिक भाऊ डोके यांनी पाठपुरावा करूत हा बदल घडवून आणला आहे.

Maharashtra Times 21 Feb 2017, 4:00 am
अल्मेडा नव्हे जनरल अरूणकुमार वैद्य मार्ग
महाराष्ट्र टाइम्स.कॉम tmcs officical address changed
अखेर महापालिका मुख्यालयाचा पत्ता बदलला

म. टा. विशेष प्रतिनिधी, ठाणे

निवडणुकीनंतर ठाणे महापालिकेत सत्ताबदल होणार की नाही, हे येत्या २३ तारखेलाच समजणार असले तरी ठाणे महापालिकेचा पत्ता मात्र आता बदलला आहे. पालिका मुख्यालय नव्या ठिकाणी स्थलांतरित करण्याचा कोणताही प्रयत्न सुरू नाही. मात्र, आजवर ठाणे महापालिका मुख्यालय, अल्मेडा रोड, पाचपाखाडी या पालिकेच्या पत्यावर आता अल्मेडा रोड ऐवजी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग असा बदल करण्यात आला आहे. ठाण्यातील ज्येष्ठ आणि सजग नागरिक भाऊ डोके यांनी पाठपुरावा करूत हा बदल घडवून आणला आहे.

पाचपाखाडी येथे ठाणे महापालिकेचे मुख्यालय आहे. या इमारती भोवती तीन रस्ते आहे. एका बाजूला संत ज्ञानेश्वर पख, दुसरीकडे अल्मेडा रोड आणि तिसऱ्या बाजूला जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग आहे. या इमारतीचे मुख्य प्रवेशद्वार वैद्य मार्गावर आहे. ज्या मार्गावर मुख्य प्रवेशद्वार असेल त्या मार्गाचा उल्लेख पत्यावर अपेक्षित असतो. मात्र, पालिकेतील प्रशासकीय अधिकारी आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या लेटरहेडवर गेल्या ३० वर्षांपासून ‘अल्मेडा रोड’ असा उल्लेख केला जात होता. पाचपाखाडी विभागात राहणारे ज्येष्ठ नागरिक भाऊ डोके यांना हे खटकले. त्यांनी महापालिका प्रशासनाकडे यासंदर्भात पाठपुरावा सुरू केला.

पालिकेचे मुख्यालय या इमारतीत सुरू झाले, तेव्हा वैद्य मार्ग अस्तित्वात नव्हता. पालिकेने ५ फेब्रुवारी १९९१ रोजी जनरल अरुणकुमार वैद्या यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण करत त्या रस्त्यालाही वैद्य यांचे नाव दिले. मुख्यालयाचे प्रवेशद्वार त्याच रस्त्यावर असल्याने पत्ताही बदलायला हवा होता. मात्र, त्याकडे पालिकेने दुर्लक्ष केले होते. डोके यांनी पालिकेचा सचिव विभाग, जनसंपर्क विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, सुरक्षा विभाग याठिकाणी त्यांना पत्रव्यवहार ककेला. माहितीच्या अधिकारात तपशील मागवावा लागला. त्यात कचराळी तलावासमोर मुख्य प्रवेशद्वार असल्याची कबुली पालिकेने दिली. मात्र, त्यानंतर पत्त्यामध्ये बदल करण्यासाठी तब्बल दीड वर्षे प्रतीक्षा करावी लागली. डोके यांनी केलेल्या सतत पाठपुराव्यानंतर महापालिकेच्या भांडार विभागाच्या उपायुक्तांनी एक परिपत्रक काढून यापुढील पत्र व्यवहारात अल्मेडा रोडऐवजी महापालिका मुख्यालय, सरसेनापती जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग असा बदल करण्याचे आदेश सर्व संबंधित खात्यांना दिले आहेत. त्यामुळे अडीच वर्षांपासून सुरू असलेला भाऊ डोके यांच्या लढा अखेर यशस्वी ठरला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज