एकूण ८ हजार ७७२ करोनाबाधित ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत मंगळवारी दिवसभरात २६६ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. आता शहरातील एकूण करोनाबाधितांची संख्या ८ हजार ७७२ झाली आहे. वाढत्या रुग्णसंख्येबरोबर करोनामुळे मृत्यूंची संख्याही वाढत आहे. गेल्या २४ तासांत १५ जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा ३०७वर पोहोचला आहे. उपचार घेऊन घरी गेलेल्या रुग्णांची एका दिवसातील संख्या ६२४ आहे. आतापर्यंत शहरातील चार हजार ६०७ रुग्ण बरे झाले आहेत. तर महापालिका क्षेत्रामध्ये उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण ५४ टक्क्यांवर पोहोचले आहे.
ठाण्यात करोना रुग्णांची संख्या वाढली, आकडा ८ हजार ७७० च्या वर
वाढत्या रुग्णसंख्येबरोबर करोनामुळे मृत्यूंची संख्याही वाढत आहे. गेल्या २४ तासांत १५ जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा ३०७वर पोहोचला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Jul 2020, 8:02 am