अ‍ॅपशहर

ट्रॅकमनचा अपघाती मृत्यू

रेल्वे मार्गामध्ये काम करत असताना ट्रॅकमन जोगेश्वर प्रजापती (५५) यांना गाड्यांचा अंदाज न आल्याने गाडीची धडक बसून त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Jul 2019, 4:31 pm
म. टा. वृत्तसेवा, कल्याण/बदलापूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम trackmans accidental death
ट्रॅकमनचा अपघाती मृत्यू


रेल्वे मार्गामध्ये काम करत असताना ट्रॅकमन जोगेश्वर प्रजापती (५५) यांना गाड्यांचा अंदाज न आल्याने गाडीची धडक बसून त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली.

मध्य रेल्वेवर ट्रॅकमन असलेले प्रजापती खर्डी स्थानकादरम्यान दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास रुळांच्या दुरुस्तीचे काम करत होते. कामात मग्न असलेल्या प्रजापती यांना मागून येणाऱ्या गाडीचा अंदाज आला नाही. यामुळे गाडी जवळ येऊन हॉर्न देताच त्यांनी दुसऱ्या मार्गावर उडी मारली. मात्र याचवेळी दुसऱ्या मार्गावरही लोकल आल्याने धडकेत प्रजापती यांचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रवासी संघटनेचे सदस्य राजेश घनघाव यांनी घटनास्थळी धाव घेत रेल्वे कर्मचाऱ्यांना घटनेची माहिती दिली. दरम्यान प्रजापती हे कल्याण पूर्वेतील रहिवासी असून या घटनेची माहिती त्यांच्या नातेवाईकांना दिल्यानंतर रात्री त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शहापूर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला

बदलापुरात एकाचा मृत्यू

बदलापूर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या उड्डाणपुलाखाली असलेल्या एका नाल्यावरील रेल्वे रुळावर एका व्यक्तीचा रेल्वे अपघातात चिरडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या मार्गावरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या चेन्नई एक्स्प्रेसच्या मोटरमनला धडावेगळे शीर दिसल्याने मोटरमनने स्टेशन मास्तरला माहिती दिल्यानंतर हा अपघात समोर आला आहे. मात्र या अपघाताने एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी पावसाचा जोर अधिक असल्याने मासळी बाजाराशेजारी नाल्यालाही पाण्याचा प्रवाह वाढला होता. त्यामुळे मृत व्यक्तीचे धड शोधण्यात अडथळे येत होते. अखेर अग्निशमन दलाच्या पथकाने काही तासांच्या प्रयत्नानंतर हे धड शोधून काढले. मृत व्यक्ती ३० ते ३५ वयाची असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. हा अपघात होता की आत्महत्या हे अद्याप कळू शकलेले नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज