अ‍ॅपशहर

मेट्रोच्या गर्डर उभारणीसाठी वाहतूक बंद, २० तारखेपर्यंत काय आहेत पर्यायी मार्ग, वाचा सविस्तर...

Mumbai Traffic Update Today : मुंबई मेट्रो चार प्रकल्पाच्या कामासाठी १७ ते २० जानेवारीपर्यंत वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. यामुळे अनेक शहरांमध्ये वाहतुकीसाठी रस्ते बंद करण्यात आले असून पर्यायी मार्गही देण्यात आले आहेत. या दरम्यान, कोणते मार्ग बंद आणि कोणत्या मार्गांवर वाहतूक वळवण्यात आली आहे? वाचा सविस्तर...

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 18 Jan 2023, 12:27 pm
ठाणे : मुंबई मेट्रो चार प्रकल्पाच्या कासारवडवली ते गायमुख दरम्यानच्या मेट्रो कामासाठी खांबाची उभारणी पूर्ण झाली असून त्यावर गर्डर उभारण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. १७ ते २० जानेवारी दरम्यान मध्यरात्री ११.५५ ते पहाटे ४ वाजेपर्यंत ही कामे केली जाणार आहेत. त्यामुळे या भागातील वाहतूककोंडी टाळण्यासाठी येथील सर्व वाहतूक बंद करून ही वाहने पर्यायी मार्गाने सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती ठाणे वाहतूक विभाग उपपोलिस आयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mumbai metro news


गर्डरचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतूकबदल कायम राहणार असून पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडोर, ऑक्सिजन गॅस वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना हे लागू राहणार नाही, असेही वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले.

डीपीसी’वर शिंदे आणि भाजप सदस्यांची वर्णी; हर्षवर्धन पाटील, शिवतारेंसह कोणत्या नेत्यांना मिळाली संधी
वाहतुकीतील बदल

मुंबई - नाशिक महामार्गाने घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जड, अवजड वाहनांना कापूरबावडी जंक्शन येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. या वाहनांना पर्याय मार्ग देण्यात आले आहेत.

- मुंबई, ठाणे येथून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी सर्व जड, अवजड वाहने कापूरबावडी वाहतूक शाखेजवळून उजवे वळण घेऊन खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुर फाटा मार्गे जातील.

- मुंबई, ठाणे येथून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी सर्व जड, अवजड वाहने कापूरबावडी जंक्शनजवळून उजवे वळण घेऊन कशेळी, अंजुर फाटामार्गे जातील.

- मुंब्रा, कळवा येथून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जड, अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेश बंद आहे. या वाहनांना मुंब्रा, कळव्याकडून घोडबंदर दिशेने जाणारी सर्व वाहने ही गॅमनमार्गे खारेगाव खाडी ब्रिजखालून खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुर फाटामार्गे जातील.

- नाशिककडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जड, अवजड वाहनांना मानकोली नाका येथे प्रवेश बंद आहे. नाशिककडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी सर्व वाहने मानकोली ब्रिजखालून उजवे वळण घेऊन अंजुर फाटामार्गे जातील.

- जड - वाहने सोडून इतर वाहने कासारवडवली सिग्नल पेट्रोल पंप कट येथून डावीकडे वळण घेऊन सेवा रस्त्याने पुढे नागलाबंदर सिग्नल कटजवळ उजव्या बाजूस वळण घेऊन मुख्य रस्त्यास पोहचून इच्छित स्थळी जातील.

महत्वाचे लेख