अ‍ॅपशहर

दोन चिमुरडे रात्री खेळायला बाहेर पडले, बराच वेळ परतलेच नाहीत; जलवाहिनीच्या खड्ड्यामुळे घात

जलवाहिनीच्या कामासाठी ठेकेदाराने खोदलेल्या खड्ड्यात पडून दोन लहान मुलांचा मृत्यू झाला. रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. यानंतर स्थानिकांनी परिसरात रास्तारोको केला.

| Edited byकुणाल गवाणकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Mar 2023, 4:33 pm
कल्याण: जलवाहिनीच्या कामासाठी ठेकेदाराने खणलेल्या खड्ड्यात पडून दोन लहान मुलांचा मृत्यू झाला असून नेवाळी नाका येथील डावलपाडा येथे ही घटना घडली आहे. दरम्यान या प्रकरणात शासनाने आणि कंत्राटदारांनी गांभीर्याने लक्ष न दिल्याने त्या मुलांच्या नातेवाईक आणि परिसरतील लोकांनी काही काळ बदलापूर पाईपलाईन रोड, नेवाळी नाका येथे रास्तारोको केला होता. हिललाईन पोलिसांनी रास्ता रोको करण्याऱ्या जमावाला हटवले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम two children dies


नेवाळी नाकाजवळील डावलपाडा येथे एमआयडीसीचे पाईपलाईन दुरुस्तीसाठी काम चालू असून दुरुस्तीसाठी कंत्राटदाराने खड्डा खणला होता. या खड्ड्यात पाणी साचलं होतं. मात्र खड्ड्याभोवती कोणत्याही प्रकारच्या सुरक्षात्मक उपाययोजना किंवा बॅरिकेडिंग केलेली नव्हती. दरम्यान याच परिसरात राहणारी दोन लहान मुले बुधवारी रात्री खेळत असताना या खड्ड्यात पडली आणि त्यांचा बुडून मृत्यू झाला.

सूरज राजभर (वय ८ वर्षे) आणि सनी यादव (वय ६ वर्षे) अशी दोन मृत मुलांची नावे आहेत. यानंतर हिललाईन पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मात्र स्थानिकांनी कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दरम्यान या प्रकरणात शासन आणि कंत्राटदार यांनी गांभीर्याने लक्ष न दिल्याने त्या मुलांच्या नातेवाईक आणि परिसरातील लोकांनी काही काळ बदलापूर पाईपलाईन रोड, नेवाळी नाका येथे रास्तारोको केला होता. हिललाईन पोलिसांनी रास्ता रोको करण्याऱ्या जमावाला हटवले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज