अ‍ॅपशहर

गाडीला धडक दिल्याच्या वादातून तरुणाची हत्या, पाच तासात पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरच्या कॅम्प १ भागात गाडीला धडक दिल्याच्या वादातून तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र, पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवले आणि पाच तासात आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byप्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 May 2022, 7:45 pm
ठाणे : उल्हासनगरच्या कॅम्प १ भागातून सोमवारी रात्री आकाश संचेरिया भाजी विक्रेता तरुण त्याचा मित्र भरत उर्फ सोनू पाटडीया याच्यासोबत तीन चाकी टेम्पोने जात होता. यावेळी त्यांच्या मागून करण जसुजा हा तरुण दुचाकीवरून आला आणि त्याने या टेम्पोसमोर दुचाकी आडवी लावत तुम्ही माझ्या दुचाकीला धडक दिल्याचा आरोप केला. तसंच टेम्पो चालवत असलेल्या आकाश संचेरिया याला त्याने मारहाण करायला सुरुवात केली. त्यामुळे भरत उर्फ सोनू पाटडीया हा मध्ये पडला असता करण जसुजा याने त्याला खाली पाडून मारहाण केली. या मारहाणीत जागीच बेशुद्ध पडलेल्या भरत उर्फ सोनू पाटडीया याला रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केलं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Ulhasnagar News
गाडीला धडक दिल्याच्या वादातून तरुणाची हत्या, पाच तासात पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या


याप्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली. दुचाकी चालक हा अनोळखी असल्यानं त्याचा माग काढता येत नव्हता. मात्र उल्हासनगर पोलिसांनी आपलं नेटवर्क वापरून अवघ्या ५ तासात दुचाकीचालक करण जसुजा याला बेड्या ठोकल्याची माहिती परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली आहे.

घाणेरडं राजकारण थांबवा, राजकीय पक्षांमध्ये मध्यस्थीला मी तयार आहे: सुप्रिया सुळे
दुचाकीचालक करण जसुजा याच्यावर यापूर्वी कोणते गुन्हे दाखल आहेत का? याचा तपास पोलिसांकडून सध्या सुरू आहे. कोणताही धागादोरा अवघ्या काही तासात उल्हासनगर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्याने पोलिआंच्या कामगिरीचं कौतुक होत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज