अ‍ॅपशहर

आधार कार्डाच्या लिंक तोडा

'आधारकार्डाची जोडणी तोडा'म टा...

Maharashtra Times 26 Jun 2018, 4:00 am

'आधारकार्डाची

जोडणी तोडा'

म. टा. वृत्तसेवा, ठाणे

ठाणे मतदाता जागरण अभियानाच्या वतीने आधारकार्ड लिंक तोडा जागरण व मार्गदर्शन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही जनसुनावणी २६ जून रोजी, सायंकाळी ६.३० वाजता, मराठी ग्रंथ संग्रहालय, जिल्हा परिषदेजवळ, बाजारपेठ येथे होईल.

आधारकार्ड योजना सुरक्षित नसल्याचे खुद्द केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात कबूल केले आहे. अशावेळी आधार-सक्ती करण्यावर निर्बंध असतानाही आपला प्रत्येक व्यवहार आधारशी जोडण्याचा खेळ चालू आहे. देशभर ब्रेक आधार चेन या नावाने एक मोहीम चालू आहे, यात देशातील अनेक शहरात जनसुनावणी घेतली जात आहे. आधारकार्ड योजना, योजनेची विश्वासार्हता, देशाच्या संरक्षण आणि व्यक्तीच्या गोपनियतेशी याचा काय संबंध, योजनेतील धोके यावर जनमानसात जागरण व त्या निमित्ताने चर्चा करण्यात येणार आहे.

आधारकार्ड योजनेतील त्रुटी व सर्व योजना आधारकार्डाशी जोडण्यातील धोके यावर सर्वोच्च नायालयात सुनावणी सुरू आहे. या जनहित याचिकेची मांडणी करणाऱ्या वकील कामयानी बाली महाबळ आणि जे. डिसुझा हे बायो-मेट्रिक तज्ज्ञ या सभेत मार्गदर्शन करणार आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज