अ‍ॅपशहर

उपवनला दुर्गंधीचा विळखा

अॅम्फिथिएटर, कारंज, घाट अशा सुविधा करत उपवन तलावाजवळील पायलादेवी मंदिराच्या परिसराला देखणे रूप दिले जात असताना दुसऱ्या टोकाला वाढणाऱ्या झोपड्या, तिथल्या लोकांकडून निर्माण केल्या जाणाऱ्या घाणीच्या साम्राज्याकडे मात्र पालिकेचे दुर्लक्ष केले आहे. तलावाच्या त्या बाजूकडील दुर्गंधीमुळे तलाव परिसरात मॉर्निंग वॉक किंवा दिवसभरात फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या ठाणेकरांचे नाक मुठीत आले आहे.

Maharashtra Times 11 Jan 2017, 4:00 am
झोपड्यांच्या अतिक्रमणाकडे पालिकेचे दुर्लंक्ष
महाराष्ट्र टाइम्स.कॉम upavan lake area packed with slums
उपवनला दुर्गंधीचा विळखा



म. टा. वृत्तसेवा, ठाणे

अॅम्फिथिएटर, कारंज, घाट अशा सुविधा करत उपवन तलावाजवळील पायलादेवी मंदिराच्या परिसराला देखणे रूप दिले जात असताना दुसऱ्या टोकाला वाढणाऱ्या झोपड्या, तिथल्या लोकांकडून निर्माण केल्या जाणाऱ्या घाणीच्या साम्राज्याकडे मात्र पालिकेचे दुर्लक्ष केले आहे. तलावाच्या त्या बाजूकडील दुर्गंधीमुळे तलाव परिसरात मॉर्निंग वॉक किंवा दिवसभरात फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या ठाणेकरांचे नाक मुठीत आले आहे.

नैसर्गिकदृष्ट्या संपन्न असलेल्या उपवन तलाव परिसरात महापालिकेच्या पुढाकाराने अनेक सुविधा होत आहेत. अॅम्फिथिएटर, रंगीत कारंजे, घाट अशा अनेक प्रकल्पांसाठी पुढाकार घेणाऱ्या महापालिकेकडून परिसर सुशोभित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र याच परिसरात उभारण्यात आलेल्या झोपड्या आणि त्यांची वाढती संख्या यांकडे मात्र महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जाते. पायलादेवी मंदिराच्या शेजारील मोकळ्या परिसरात गेल्या चार वर्षांपासून काही झोपड्या दिसून येत होत्या. सुरुवातीला त्यांचे प्रमाण तुरळक असले तरी सध्या मात्र झोपड्यांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येते. दगडांवर मांडण्यात आलेली चूल आणि मोडका आडोसा असे रूप असणाऱ्या झोपड्यांमध्ये राहणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. सकाळी सहा वाजल्यापासून रस्त्यावर प्रातःविधीसाठी बसणे, तळ्यातील पाण्यात आंघोळ करणे, तळ्याच्या पाण्यात कपडे अथवा भांडी धुणे अशी मनमानी करणाऱ्या या लोकांवर महापालिकेचा अंकुश नसल्याचे दिसून येते. रस्त्यावर संसार मांडल्याने परिसर मोठ्या प्रमाणात अस्वच्छ होत असल्याची तक्रारही स्थानिकांकडून केली जाते. तर सकाळी फिरण्यासाठी निघालेल्या स्थानिकांना या परिसरातून जाणेही अशक्य होत असल्याचे सांगितले जाते. या परिसरात महिला, तरुण मुली या सकाळी फिरण्यासाठी येतात, मात्र रस्त्यावरच बसलेल्या या झोपड्यांमधील पुरुषांच्या खिळलेल्या नजरा आणि त्यांच्याकडून केली जाणारी अस्वच्छता अशा दोन्ही गोष्टींमुळे अनेकांना फिरण्याचा हा मार्गच बंद करावा लागला आहे. उघड्यावर केले जाणारे प्रातःविधी अथवा तलावाच्या पाण्याचे प्रदूषण यांमुळे परिसरात रोगराई पसरण्याची भीतीही नागरिकांकडून व्यक्त होते. त्यासह या झोपड्यांमधील रहिवासी मोठ्या संख्येने झाडे तोडत असल्याची तक्रारही स्थानिकांकडून केली जाते. महापालिकेकडून सक्तीने वृक्षारोपणासारखे प्रकल्प राबविले जात असताना या वृक्षतोडीकडे दुर्लक्ष का होते असा सवालही स्थानिकांकडून विचारण्यात येत आहे.


रस्त्यावर राहून त्यांच्याकडून परिसर अस्वच्छ केला जात आहे. या परिस्थिती वाढ होत असली तरी त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. या परिसरात पोलिसांची वेळोवेळी गस्त असूनही त्याकडे कानाडोळा होत आहे. झपाट्याने होणारी वृक्षतोड, परिसराचे विद्रुपीकरण आणि त्याचा स्थानिकांना होणारा त्रास याकडे प्रशासनाने लक्ष द्यायला हवे.

सीमा समेळ, स्थानिक रहिवासी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज