अ‍ॅपशहर

तालुक्यातील विकास कामे लागणार मार्गी

वसई तालुक्याच्या पश्चिम विभागातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच कळंब येथे पार पडली.

Maharashtra Times 24 Mar 2017, 4:00 am
म. टा. वृत्तसेवा, वसई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम vasai development projects to be completed soon
तालुक्यातील विकास कामे लागणार मार्गी

वसई तालुक्याच्या पश्चिम विभागातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच कळंब येथे पार पडली. वसई तालुक्यातील विविध विकास कामे मार्गी लावणार असल्याचे आश्वासन जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी दिले. वसईतील धूपप्रतिबंधक बंधारे तसेच रस्त्यांसाठी ११ कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

कळंब येथे झालेल्या या बैठकीला महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरा उपस्थित होते.
वसईतील रखडलेली ६९ गावांची पाणीपुरवठा योजना तात्काळ कार्यान्वित करणे, वसईत सुरू असलेली एस. टी. सेवा पुढे कायम सुरू ठेवणे, मत्स्य व्यवसाय, व मेरी टाइम बोर्डाच्या माध्यमातून विकास कामांना प्राधान्य देणे, महसूल विभागाकडून मिळणारे विविध दाखले लोकांना मिळण्यातील दिरंगाई दूर करणे, वीज वितरण व्यवस्थेतील त्रुटी दूर करणे ही पाच कामे करण्याचा ठराव या कार्यकारिणीत संमत करण्यात आला. ही कामे मार्गी लावण्यासाठी शासन व प्रशासनाच्या पातळीवर आपण सर्व ते सहकार्य करू, असे यावेळी बोलताना सवरा म्हणाले.

वसईच्या पश्चिम किनारपट्टीवर धूप प्रतिबंधक बंधाऱ्यांसाठी ७ कोटी ७० लाख रुपयांची तरतूद राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. त्यापैकी अर्नाळा किल्ला ४ कोटी २० लाख, रानगाव १ कोटी ५ लाख, कळंब १ कोटी, भूईगाव १ कोटी, अशी तरतूद करण्यात आली आहे. तर सातिवली-कामण या राज्यामार्गासाठी १ कोटी ३९ लाख रुपये तसेच नालासोपारा-गोखिवरे-वालीव ते राज्यमार्गासाठी १ कोटी २६ लाखांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती सवरा यांनी दिली. देशभरात व महाराष्ट्रात पार पडलेल्या निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशाचा दाखला देऊन वसई तालुका भाजपमय करण्यासाठी काम करा, असे आवाहन सवरा यांनी कार्यकर्त्यांना केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज