अ‍ॅपशहर

नेत्रचिकित्सा शिबिराला प्रतिसाद

गोरगरीब, गरजू रुग्णांची नेत्रचिकित्सा व्हावी तसेच त्यांना मोतीबिंदू किंवा इतर नेत्र संबंधित आजार असल्यास त्यांच्या डोळ्यावर वेळेवर उपचार व्हावेत म्हणून वसईत नुकतेच नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

Maharashtra Times 13 Dec 2017, 4:01 am
म. टा. वृत्तसेवा, वसई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम vasai eye testing camp
नेत्रचिकित्सा शिबिराला प्रतिसाद


गोरगरीब, गरजू रुग्णांची नेत्रचिकित्सा व्हावी तसेच त्यांना मोतीबिंदू किंवा इतर नेत्र संबंधित आजार असल्यास त्यांच्या डोळ्यावर वेळेवर उपचार व्हावेत म्हणून वसईत नुकतेच नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरात ११०० जणांची विनामूल्य नेत्र तपासणी केली. २२ वर्षे हे शिबीर दरवर्षी भरवले जाते. गेल्या २२ वर्षांत हजारो जणांची शिबिरातून नेत्र तपासणी झाली असून आतापर्यंत एकूण २ हजार ८२७ जणांवर विनामूल्य मोतीबिंदू ऑपरेशन करण्यात आले आहे.

वसई रोडमधील एव्हरशाइन सिटी येथील जे. बी. लुधानी शाळेत ‘जे. बी. लुधानी चॅरिटेबल ट्रस्ट’चे ट्रस्टी लछमन लुधानी व एव्हरशाइन ग्रुपतर्फे या नेत्रचिकित्सा शिबिराचे

आयोजन करण्यात आले होते. वसईतील 'वसई अंधदु:ख निवारक मंडळा'च्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी शिबिरात तपासणी केली. या शिबिराची माहिती पालघर जिल्ह्यातील गरीब, गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्यात आली होती. त्यामुळे या शिबिराचा लाभ घेण्यासाठी शेकडो जणांची रांग लागली होती.

यंदा या शिबिराचे २२वे वर्ष होते. नुकत्याच झालेल्या शिबिरात अकराशे जणांची नेत्र तपासणी करण्यात आली. ८९७ जणांना विनामूल्य चष्मे देण्यात आले. या शिबिरात झालेल्या तपासणीनंतर १५७ जणांना मोतीबिंदू असल्याचे समोर आले. त्यांच्यावर आता शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात झाली असून येत्या एका आठवड्यात सर्वांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज