अ‍ॅपशहर

राकेशचे पार्थिव आज मायदेशी

गेली दोन वर्षे जमैका येथे नोकरीसाठी राहत असलेल्या वसईच्या राकेश तलरेजा (२३) या तरुणाची जमैकात गेल्या आठवड्यात अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेने तलरेजा कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Maharashtra Times 14 Feb 2017, 4:01 am
म. टा. वृत्तसेवा, वसई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम vasai youth killed in jamaica
राकेशचे पार्थिव आज मायदेशी


गेली दोन वर्षे जमैका येथे नोकरीसाठी राहत असलेल्या वसईच्या राकेश तलरेजा (२३) या तरुणाची जमैकात गेल्या आठवड्यात अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेने तलरेजा कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राकेशच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्याचे पार्थिव भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असून आज मंगळवारी किंवा बुधवारी मृतदेह वसईत येईल, असे सूत्रांनी सांगितले.

वसई रोड पश्चिमेला राहत असलेला राकेश गेली दोन वर्षे जमैकाची राजधानी किंग्स्टन येथे एका ज्वेलर्स दुकानात काम करत होता. सायंकाळी धंदा बंद करण्याच्या वेळेस राकेश रोकड घेऊन जात असताना लुटमारीच्या उद्देशाने आलेल्या दरोडेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि रोकड घेऊन पोबारा केला, अशी माहिती पुढे आली आहे.

याबाबत भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनीही ट्वीट करून घटनेची माहिती दिली. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश त्यांनी दिल्याचे ट्वीटमध्ये म्हटले आहे. सीसीटीव्ही फुटेज मिळवून जमैकामध्ये तेथील पोलिस पुढील तपास करीत आहेत.

घर पुन्हा दिसलेच नाही...

राकेश याचे नोकरीचे कंत्राट संपत आल्याने दोन-तीन महिन्यांत तो वसईत घरी परतणार होता. त्याचे कुटुंबीय आतुरतेने त्याची वाट पाहत होते. मात्र त्यापूर्वीच ही दु:खद घटना घडली, अशी माहिती त्याच्या शेजाऱ्यांनी दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज