अ‍ॅपशहर

अहवालाने अडवला पूल!

जुन्या वर्सोवा पुलाच्या कामामुळे शहरात होणाऱ्या वाहतूककोंडीच्या प्रश्नाबाबत वाहतूक शाखेकडून विविध उपायोजना नेमण्याच्या हालचालींना वेग प्राप्त झालेला असतानाच पुलाच्या दुरुस्तीसाठी सल्लागार कंपन्यांकडून मागविण्यात आलेला अहवाल अद्याप महामार्ग प्राधिकरणाला प्राप्त झालेला नसल्याने आणखी काही काळ वाहतूककोंडीच्या समस्येला वाहनचालकांना तोंड द्यावे लागणार आहे. विशेष म्हणजे, अहवाल प्राप्तीनंतर पुलाच्या कामकाजाची दिशा ठरविण्यात येणार असून त्यानंतरच दुरुस्तीच्या मूळ कामाला वेग प्राप्त होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली.

Maharashtra Times 30 Sep 2016, 4:04 am
जुन्या वर्सोवा पुलाची दुरुस्ती अडली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम waiting for bridge situation report
अहवालाने अडवला पूल!

म. टा. प्रतिनिधी, ठाणे

जुन्या वर्सोवा पुलाच्या कामामुळे शहरात होणाऱ्या वाहतूककोंडीच्या प्रश्नाबाबत वाहतूक शाखेकडून विविध उपायोजना नेमण्याच्या हालचालींना वेग प्राप्त झालेला असतानाच पुलाच्या दुरुस्तीसाठी सल्लागार कंपन्यांकडून मागविण्यात आलेला अहवाल अद्याप महामार्ग प्राधिकरणाला प्राप्त झालेला नसल्याने आणखी काही काळ वाहतूककोंडीच्या समस्येला वाहनचालकांना तोंड द्यावे लागणार आहे. विशेष म्हणजे, अहवाल प्राप्तीनंतर पुलाच्या कामकाजाची दिशा ठरविण्यात येणार असून त्यानंतरच दुरुस्तीच्या मूळ कामाला वेग प्राप्त होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली.

मुंबई-अहमदाबाद हायवेवरून गुजरातच्या दिशेने मालाची वाहतूक करण्यासाठी महत्वाचा दुवा म्हणून ओळखला जाणारा वसई खाडीवरील जुना वर्सोवा पूल दुरुस्तीसाठी १५ सप्टेंबरपासून बंद करण्यात आला असला तरी या पुलाच्या दुरुस्तीच्या कामास अद्याप सुरुवात झालेली नाही. तसेच या पुलाच्या दुरुस्ती कामामुळे जेएनपीटीमधील अवजड वाहनांसह भिवंडी गोदामामधील अवजड वाहनांचा भार मुंबई-नाशिक महामार्गावर येत असल्याने ठाणे, कल्याण, शिळफाटा, भिवंडी शहरांमध्ये अभूतपूर्व वाहतूककोंडी उद्भवते. त्यामुळे पुढील एक ते दोन दिवसांमध्ये सल्लागारांचा अहवाल महामार्ग प्राधिकरणाकडे प्राप्त झाल्यानंतरच पुलाच्या दुरुस्तीचे अडलेले घडले पुढे सरकरणार आहे.

दरम्यान, या पुलाच्या सर्वेक्षण कामासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिल्लीमधील डॉ. रैना यांना तर आरआयबीकडून लंडनच्या रॉनबॉल कंपनीची नियुक्ती करण्यात आली असून हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर महामार्ग प्राधिकरणाकडून दुरुस्तीच्या मुख्य कामाला गती प्राप्त होणार आहे. त्यामुळे या तांत्रिक बाबींची पूर्तता होईपर्यंत वाहतूक कोंडी कायम राहण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत.

कामाचा 'अवजड' भार

मुंबई तसेच ठाण्याकडून गुजरातच्या दिशेला जाणारी अवजड वाहतूक जुन्या वर्सोवा पुलावरून जात असल्याने या पुलावर कायमच अवजड वाहनांचा भार असतो. त्यातून १९७० साली बांधण्यात आलेल्या या पुलाची महाड येथील सावित्री पूल दुर्घटनेनंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या पुलाची तपासणी केली असता त्याच्या गर्डरला भेगा पडल्याचे आढळून आले. याआधी दोनच वर्षांपूर्वी याच पुलाच्या दुरुस्तीचे किरकोळ दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र त्यानंतरही पुन्हा एकदा अशाप्रकारे पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला सामोरे जावे लागत असल्याने ऐन दिवाळीतच प्रचंड वाहतूककोंडीचा फटका आजूबाजूच्या परिसराला बसू शकतो, अशी शक्यता वाहतूक शाखेतील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज