अ‍ॅपशहर

सेल्फी स्पर्धेतील विजेत्यांची प्रतीक्षाच

उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीत मतदान करून सेल्फी पाठवणाऱ्या मतदारांना आयुक्तांनी एका उपक्रमांतर्गत मालमत्ता करात २० टक्के सुट देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सहा महिन्यांचा कालावधी उलटूनही पालिकेच्या अंतिम १०० मतदारांची नावे घोषित करण्यास मुहूर्त मिळालेला नाही.

Maharashtra Times 20 Aug 2017, 3:00 am
म. टा. वृत्तसेवा, उल्हासनगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम waiting for selfie competition winner in ulhasnagar
सेल्फी स्पर्धेतील विजेत्यांची प्रतीक्षाच


उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीत मतदान करून सेल्फी पाठवणाऱ्या मतदारांना आयुक्तांनी एका उपक्रमांतर्गत मालमत्ता करात २० टक्के सुट देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सहा महिन्यांचा कालावधी उलटूनही पालिकेच्या अंतिम १०० मतदारांची नावे घोषित करण्यास मुहूर्त मिळालेला नाही. त्यातच आयुक्तांनी आता गणेशोत्सवात डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना दोन हजार रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केल्याने पालिका हे आश्वासन पाळणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी मतदान करणाऱ्या मतदारांना हॉटेल्स, रिक्षातून प्रवास अशा विविध ठिकाणी २० टक्के सुट देण्याचे उपक्रम राबवले होते. याच उपक्रमांतर्गत पालिकेनेही मतदान करणाऱ्या नागरिकांनी सेल्फी काढून पाठवल्यास निवडक शंभर मतदारांना मालमत्ता करात २० टक्के सुट देण्याचे आश्वासन दिले होते. याच उपक्रमाला शहरातील सहाशे नागरिकांनी प्रतिसाद देत आपले सेल्फी पालिकेच्या क्रमांकावर पाठवले होते. मात्र निवडणुकीचा निकाल लागून सहा महिन्यांचा कालवधी उलटला, तरी महापालिकेला मतदान करून सेल्फी पाठवणाऱ्या मतदारांची अंतिम यादी घोषित करण्यासाठी मुहूर्त मिळाला नसल्याने नागरिकांनी पालिकेच्या कारभाराविरोधात नाराजी व्यक्त केली. त्यात गणेशोत्सवात शहरात मोठ्या प्रमाणात डॉल्बीचा वापर करण्यात येत असल्याने ध्वनिप्रदूषणाच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त होतात. पोलिसांनी डॉल्बी लावणाऱ्या मंडळांवर कारवाईचे आदेश दिले असले, तरी उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त यांनीही शहरातील गणेशोत्सव मंडळांना डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. डॉल्बी न वाजवणाऱ्या मंडळांना पालिकेने दोन हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. परंतु पालिकेने या पूर्वी निवडणूक काळात मतदान करून सेल्फी काढणाऱ्या मतदारांना मालमत्ता करात २० टक्के सुट देण्याचे आश्वासनही पूर्ण न केल्याने, डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजऱ्या करणाऱ्या मंडळांना तरी महापालिका दोन हजार रुपयांचे बक्षीस खरेच देणार की, केवळ आश्वासने देत मंडळांना आकर्षित केले जात, असे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज