अ‍ॅपशहर

विजेचा खेळखंडोबा न थांबल्यास आंदोलन

कल्याण शहरासह नजीक असलेल्या मोहने परिसरात काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. याबाबत अनेकदा महावितरणाकडे तक्रारी करूनही काहीच कार्यवाही होत नसल्याने मनसेच्या नगरसेविका सुनंदा कोट आणि विभागप्रमुख राहुल कोट यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना जाब विचारला.

Maharashtra Times 20 Jul 2017, 3:00 am
कल्याण : कल्याण शहरासह नजीक असलेल्या मोहने परिसरात काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. याबाबत अनेकदा महावितरणाकडे तक्रारी करूनही काहीच कार्यवाही होत नसल्याने मनसेच्या नगरसेविका सुनंदा कोट आणि विभागप्रमुख राहुल कोट यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना जाब विचारला. यावेळी प्रामाणिक बिल भरणाऱ्या ग्राहकांना विजेच्या लपंडावाचा त्रास होत असून या समस्येवर तोडगा न काढल्यास नागरिकांना वीज बिल न भरण्याचे आवाहन करू, असा इशारा देण्यात आला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम warns to protest against mseb
विजेचा खेळखंडोबा न थांबल्यास आंदोलन


कल्याण पश्चिमेकडील जवळच असलेल्या मोहने येथे काही दिवसांपासून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. दिवसभरात १० ते १५ वेळा वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत महावितरण कार्यलयात तक्रारी केल्या असता कार्यलयातून फिडर ट्रिप होत असल्याचे तसेच पॉवर हाऊस सब स्टेशनमध्ये बिघाड असल्याची उत्तरे दिली जात असल्यामुळे या विजेच्या समस्येतून नागरिकांची सुटका होणार तरी केव्हा, असा प्रश्न विचारला जात आहे. या समस्येबाबत मनसे नगरसेविका सुनंदा कोट यांनी महावितरणकडे पाठपुरावा करत या समस्येवर तोडगा काढण्याची मागणी केली. मात्र त्यानंतर ही महावितरणने काहीच कार्यवाही न केल्याने अखेर मंगळवारी मनसे नगरसेविका अ प्रभागक्षेत्र सभापती सुनंदा कोट आणि विभागप्रमुख राहुल कोट यांनी महावितरणचे एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर राजेंद्र यादव यांची भेट घेत वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत अनेकदा मागणी करून महावितरण काहीच कारवाई करत नसल्याने या समस्येवर तत्काळ तोडगा न काढल्यास महावितरण विरोधात तीव्र आंदोलन छेडन्यात येईल तसेच नागरिकांना वीज बिल न भरण्याचे आवाहन करत अनोखे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज