अ‍ॅपशहर

पाणीटंचाईने वृद्धाचा मृत्यू

तालुक्यातील हिंगळूद येथील नारायण घरत (६०) या वृद्धाला पाण्यासाठी जीव गमवावा लागला. पाणीटंचाईने झालेला हा शहापूर तालुक्यातील दुसरा मृत्यू आहे. पाणीपुरवठा विभागाचे वेळकाढू धोरण व पाणीयोजनांतील भ्रष्टाचारामुळेच जीवास मुकावे लागत असल्याचा आरोप केला जात आहे.

Maharashtra Times 26 May 2017, 3:00 am
म. टा. वृत्तसेवा, शहापूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम water crisis in shahapur one dead
पाणीटंचाईने वृद्धाचा मृत्यू

तालुक्यातील हिंगळूद येथील नारायण घरत (६०) या वृद्धाला पाण्यासाठी जीव गमवावा लागला. पाणीटंचाईने झालेला हा शहापूर तालुक्यातील दुसरा मृत्यू आहे. पाणीपुरवठा विभागाचे वेळकाढू धोरण व पाणीयोजनांतील भ्रष्टाचारामुळेच जीवास मुकावे लागत असल्याचा आरोप केला जात आहे.

हिंगळूद तळवाडासाठी २००७-२००८ मध्ये २०.८९ लाखांची नळपाणीपुरवठा योजना मंजूर झाली होती. मात्र पूर्ण झाल्यापासूनच ही योजना कायमची बंद असल्याने हिंगळूदकरांना दरवर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. सध्या गावकऱ्यांना चार किमीवरील मेट या पाड्यावरील विहीरीवरून पाणी आणावे लागते. हिंगळूद गावातील नारायण घरत सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास डोक्यावरून मेट येथून ड्रममधून पाणी आणत असताना दरड चढून आल्यावर ते चक्कर येऊन पडले. घरी आल्यानंतर पुन्हा चक्कर आल्याने त्यांना शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, परंतु त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना ठाणे येथील सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. मात्र वैद्यकीय उपचार मिळूनही त्यांना वाचवण्यात यश आले नाही. महिनाभरापूर्वी कसारा परीसरातील दांड येथील तुकाराम आगीवले (४०) यांचाही पाणी आणताना मृत्यू झाला होता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज