अ‍ॅपशहर

गाऊन घालून मंदिरात गेल्यानं महिलांमध्ये जुंपली

गाऊन घालून मंदिरात प्रेवश केल्यानं दोन महिलांमध्ये मारामारी झाल्याची घटना कल्याण इथं घडली आहे. मंदिरात गाऊन घालून प्रवेश केल्याचा जाब विचारल्यानं महिलेनं समोरच्या महिलेला मारहाण केली.

Maharashtra Times 15 Nov 2017, 2:57 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम woman cop beats up lady devotee for objecting to her dress
गाऊन घालून मंदिरात गेल्यानं महिलांमध्ये जुंपली


गाऊन घालून मंदिरात प्रेवश केल्यानं दोन महिलांमध्ये मारामारी झाल्याची घटना कल्याण इथं घडली आहे. मंदिरात गाऊन घालून प्रवेश केल्याचा जाब विचारल्यानं महिलेनं समोरच्या महिलेला मारहाण केली.

मारहाण करणारी महिला पोलिस कर्मचारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून मारहाणीचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. कल्याणच्या तिसगाव भागातील तिसाई मंदिरात काल (मंगळवारी) रात्री सातच्या सुमारास महिला पोलिस अधिकारी प्रतीक्षा लाकडे मंदिरात गाऊन घालून गेल्या. या मंदिरात महिलांनी गाऊन घालून जाऊ नये असा नियम असल्यानं आशा गायकवाड या स्थानिक महिलेनं प्रतीक्षा लाकडे यांना याबाबत जाब विचारला.यानंतर प्रतीक्षा लाकडे यांचा पारा चढला अन् संतापाच्या भरात लाकडे यांनी गायकवाड यांना जमिनीवर खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात आशा गायकवाड जखमी झाल्या आहेत.

गाऊन घातलेल्या महिलांना मंदिरात प्रवेश न देणं हा प्रकार चुकीचा असला तरी, लाकडे या पोलीस अधिकारी असल्यानं त्या या बाबात तक्रार करू शकल्या असत्या.त्यामुळं कल्याण पूर्व भागातील जनतेकडून पोलिसांबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.

या दोन्ही महिलांच्या विरोधात तक्रार दाखल करून घेतल्यानं पोलिस लाकडे यांना पाठीशी घालत आहेत असा आरोपही स्थानीकांकडून करण्यात येत आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज